मुंबई, 01 डिसेंबर : विमान दुर्घटनेची बरीच प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. प्लेन क्रॅश, विमानाला आग लागल्याचे व्हिडीओही तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर विमानाचा असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. आकाशातून कोसळणाऱ्या विमानाला एका मुलाने हातात कॅच केलं आहे. आकाशात उडणारं विमान दूरून छोटंसं दिसत असलं तरी ते खूप मोठं असतं. अशा वेळी विमान हातात पकडणं कसं काय शक्य आहे? असं तुम्हीही म्हणाल. पण हे प्रत्यक्षात घडलं आहे. आता ते कसं ते तुम्ही व्हिडीओमध्येच पाहा. व्हिडीओत पाहू शकता एक प्लेन आकाशात उडतं आहे. ते जमिनीच्या दिशेनं येतं आहे. विमानाने नियंत्रण गमावल्याचं दिसतं आहे. खाली काही लोक उभे आहेत. आता हे आऊट ऑफ कंट्रोल झालेलं प्लेन जमिनीवर आदळतं की काय असंच वाटतं. पण पुढे जे घडतं ते धक्कादायक आहे. म्हणजे व्हिडीओ पाहूनही तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. हे वाचा - VIDEO - बापरे! हा असा कसला परिणाम; प्लेन उडताच काही क्षणात अचानक म्हातारी झाली महिला पुढे तुम्ही पाहिलं तर प्लेन वेगाने पुढे जात ते क्रॅश होईल असं वाटतं तोच समोर छतावर एक मुलगा उभा आहे. तो ते प्लेन आपल्या हातात धरतो. तेव्हा आपल्यालाही जबर झटका बसतो.
उडताना खरं वाटणारं हे विमान प्रत्यक्षात मात्र एक खेळणं होतं. रिमोट कंट्रोलने हे विमान उडवलं जात होतं. हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. videonation.teb इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. हे वाचा - Shocking! आकाशातून थेट माणसाच्या डोक्यावर; विमानाच्या खतरनाक लँडिंगचा VIDEO VIRAL तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.