मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO - बापरे! हा असा कसला परिणाम; प्लेन उडताच काही क्षणात अचानक म्हातारी झाली महिला

VIDEO - बापरे! हा असा कसला परिणाम; प्लेन उडताच काही क्षणात अचानक म्हातारी झाली महिला

अचानक बदलला पायलटचा चेहरा.

अचानक बदलला पायलटचा चेहरा.

महिला पायलटच्या चेहऱ्यातील बदल पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

मुंबई, 07 नोव्हेंबर : बालपण, तरुणपण आणि म्हातारपण... जसजसं वय वाढतं तसतसं शरीर, चेहऱ्यात बदल होतो. पण हा कालावधी खूप मोठा असतो. यात बरीच वर्षे जातात. पण सध्या सोशल मीडियावर असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. एक तरुण महिला काही क्षणातच म्हातारी होते.

एक महिला पायलट प्लेन उडवत होती. तेव्हा काही क्षणातच ती वयस्कर दिसू लागली. @fasc1nate ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात एक महिला पायलट  फायटर प्लेन उडवते आहे. यावेळी तिला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता महिला प्लेन उडवते आहे. ती प्लेन हवेत फिरवते तेव्हा अचानक तिचा चेहरा बदलू लागतो. तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात. ती वयस्कर दिसू लागते.  पण काही वेळाने पुन्हा विमान फिरतं, तेव्हा तिचा चेहरा पूर्ववत होतो. ती आधीसारखी तरुण दिसू लागते. आपला चेहरा पुन्हा नीट झाल्याचं पाहून महिलेलाही हायसं वाटतं.

हे वाचा - आईशप्पथ! फ्लाईटनं प्रवास करताना बॅगेच्या उडाल्या चिंधड्या; नेमकं काय झालं? वाचा सविस्तर

आता या महिलेसोबत असं नेमकं झालं तरी कसं हा सर्वात मोठा प्रश्न. हा कोणताही इफेक्ट नाही. हे असं प्रत्यक्षात घडलं आङे. याचं कारण म्हणजे जी-फोर्समुळे. जसं जी फोर्स वाढलं तसा तिचा चेहरा ताणला गेला आणि ती वयस्कर दिसू लागली.

या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने 25 वर्षांची महिला 75 वर्षांची झाली. प्रत्येक महिला नेगेटिव्ह जीमुळे कमी वयाची दिसू शकते. तर दीर्घ श्वास घेतल्याने ती अशावेळी बेशुद्ध होणार नाही, अशा प्रतिक्रिया येत आहेत.

हे वाचा - Optical Illusion: समुद्राच्या तळाशी दडलाय खजिना; 10 सेकंदात शोधणारे ठरतील खरे हुश्शार

तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

First published:

Tags: Airplane, Viral, Viral videos