मुंबई 05 नोव्हेंबर : अमूक एखाद्या चित्रामध्ये एखादी बाब शोधून काढण्याचं चॅलेंज देत असंख्य फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या चित्रांना ‘ऑप्टिकल इल्युजन’ असंही म्हटलं जातं. असंच एक छायाचित्र सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यात समुद्राच्या तळाशी खजिना लपवण्यात आला आहे. असंख्य वेळा प्रयत्न करूनही या चित्रातील खजिना शोधून काढण्यात लोकांना अपयश येत आहे. Optical Illusion: निसर्गरम्य अशा फोटोत दडलाय एक कॅमेरामन; हुशार असाल तरच शोधून काढू शकाल एका कलाकारानं ‘ऑप्टिकल इल्युजन’चे हे छायाचित्र तयार केलं आहे. समुद्राच्या तळाशी खजिना लपलाय. जर गरुडाप्रमाणे तुमची नजर असेल आणि पूर्ण एकाग्रतेने चित्र पाहिल्यास यातील खजिना सापडू शकतो. पण अवघ्या 10 सेकंदांत तो खजिना शोधून काढण्याचं आव्हान दिलं तर मात्र तुमचं डोकं गरगरायला लागेल. इतक्या कमी वेळेत ते सापडणं बरीच कठीण गोष्ट असल्याचं दिसतं. ऑप्टिकल इल्युजनच्या छायाचित्रात अशी एखादी गोष्ट शोधून काढणं हेच मोठं आव्हान असतं. समुद्रातील या छायाचित्राचेच उदाहरण घेतल्यास खजिना अगदी तुमच्या डोळ्यांसमोर आहे; पण तो तुम्ही शोधू शकत नाही. खजिन्याचा शोध लावलात तर तुमची बुद्धिमत्ता अलौकिक असल्याचं मानलं जाईल. परंतु जर तुम्ही या ऑप्टिकल इल्युजनच्या टेस्टमध्ये अपयशी ठरलात तर तुम्हाला इतरांप्रमाणे गणण्यात येईल. शोधून पाहा मिळतो का खजिना? ऑप्टिकल इल्युजनच्या छायाचित्रात समुद्राच्या तळाशी अनेक जीव आहेत. इथं गवत, जेली फिश, ऑक्टोपस, छोटे मासे, खेकडे, शिंपले अशा असंख्य गोष्टी दिसत आहेत. याच्या आसपासच खजिना लपलेला आहे. शोधून पाहा यात खजिना सापडतो का? अनेकदा प्रयत्न करून जर खजिना नजरेस पडत नसेल तर तुम्हाला त्यासाठी काही मदत करूयात. ऑप्टिकल इल्युजनचे छायाचित्र पाहताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे, असे छायाचित्र तयार करताना कलाकार नेहमी वस्तूंना कुठल्या तरी कोपऱ्यात, डाव्या किंवा उजव्या बाजूला लपवतात. आता काही प्रमाणात तुम्हाला खजिना शोधण्यात यश आले असेल. परंतु तरीही तो दिसत नसेल तर पांढऱ्या वर्तुळावर एक नजर टाका मग खजिना दिसेल. जे रुग्णालयात सापडला रहस्यमयी बोगदा, Viral Video ने एकच खळबळ ऑप्टिकल इल्युजन म्हणजे काय? ऑप्टिकल इल्युजन म्हणजे काय? असा प्रश्न नेहमी विचारला जातो. ऑप्टिकल इल्युजन म्हणजे एखाद्या वस्तूचे किंवा चित्राचे असे चित्रण ज्याकडे भिन्न दृष्टीकोनातून पाहिले तर त्याची भिन्न स्वरूपे दिसतात. एक सामान्य मानली मेंदू प्रत्येक दृष्टीकोनातून भिन्न धारणा बनवून वस्तू किंवा प्रतिमा वेगळ्या पद्धतीनं पाहू शकतो. चित्रात वस्तू अगदी समोरचं असते, पण ती सहजासहजी शोधणं अवघड जातं. ऑप्टिकल इल्युजनच छायाचित्र बनवताना कलाकाराच्या कलेचा कस लागत असतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.