मुंबई, 5 नोव्हेंबर: प्रवासाला जाताना आपण आपल्या सामानाची नेहमीच काळजी घेतो. तसंच रेल्वेने प्रवास करताना सामानाची काळजी घ्या अशी अनाउन्समेंट सतत होत असते. कारण, प्रवास करताना चुकून तुमचं सामान चोरीला जाऊ शकतं. परंतु, फ्लाईटने प्रवास करताना लगेजचे युनिट स्वतंत्र असतं. त्यामुळे कधीकधी तुमचे सामान खराब होण्याची शक्यता असते. अशीच एक घटना नुकतीच घडलीय.
अनेकदा आपण एअरपोर्टवर बॅग लगेज ट्रॅकवर यायला वेळ लागणं, सामानाची तुटफूट होणं असे अनेक व्हिडिओ पाहतो. अशावेळी आपण एअरपोर्ट व्यवस्थापनाला दोष देतो. सध्या अशीच एका घटना चर्चेत आहे. यात बॅगची दुरावस्था झाली असल्याचे स्पष्ट दिसतंय. याचा फोटो हा रेडिट या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म वर शेअर केला गेलाय.
‘माझ्या काकांच्या बॅगची फ्लाईटच्या लगेज युनिटमध्ये झालेली अवस्था’ अशी कॅप्शन देऊन त्या व्यक्तीच्या पुतण्याने फोटो टाकलाय. फोटो पाहिल्यावर लक्षात येतय की, बॅग एका बाजूने वरपासून खालपर्यंत फाटलीय. तसंच झिपकडला भाग हा फाडल्यासारखाच दिसतोय आणि बॅग अर्धवट उघडी आहे. एकंदरीत, बॅगेची चांगलीच चिरफाड झालीय.
हेही वाचा: पुरुषांचा प्रामाणिकपणा तपासण्याची नोकरी; येथे सुंदर स्त्रिया होतात मालामाल
हा फोटो सोशल मीडियावर आल्याने व्हायरल झालाय. या प्रकारामुळे प्रवाशांच्या मनात आपल्या सामानविषयी काळजी निर्माण झालीय. त्यामुळे, या फोटोवर नेटिझन्सकडून विविध प्रतिक्रिया आल्यात. 97 हजारांहून अधिक लोकांनी फोटोला लाईक केलंय. 4000 हजारांहून अधिक नेटिझन्सनी कमेंट केल्या असल्याचं समजतंय.
एका व्यक्तीने म्हटलंय, 'काही जण दात शिवशिवल्यावर चावण्यासाठी जसं एखादी गोष्ट घेतात, तसंच या बॅगेसोबत झाल्यासारखं वाटतंय.'
लोकांच्या ज्या विविध प्रतिक्रिया आल्यात, त्यातील एकाने तर मजेशीर प्रश्नांचा भडिमारच केलाय. तो म्हणतो, 'या बॅगला कुणी आग लावली होती का? विमानाचा या बॅगमुळे अपघात झाला का? कुठलं अजगर विमानाचा पाठलाग करत होतं का? एकाने असंही विचारलंय की, ' फ्लाईट लँड झालं का यांनी वाटेतच बॅग फेकून दिली?'
अर्थात, विमानतळ व्यवस्थापनकडून काहीच प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु, लोकांनी व्यवस्थपनाच्या कारभारावर आणि लगेज कर्मचाऱ्यांवर चांगलीच टीका केल्याचं कळतंय. यासाठी, प्रवास करताना आवश्यकतेपेक्षाही कमीच सामान घ्यायला हवं असंच म्हणावं लागेल. त्यामुळे चिंता राहणार नाही आणि प्रवास सुखकर होईल. इच्छितस्थळी आवश्यक वस्तू विकत घेता येऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.