नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर : आपला विवाह (Wedding) सोहळा संस्मरणीय ठरावा, असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं. त्यामुळे नवरदेव आणि वधू पक्ष त्या दृष्टीने विवाहाची संपूर्ण तयारी करत असतात. विवाहस्थळापासून वर आणि वधूचे कपडे, मानपान, जेवणाचे पदार्थ, पाहुण्यांचं स्वागत आदी सर्व गोष्टी काटेकोर आणि नेटक्या पद्धतीने कशा होतील, याकडे दोन्हीकडच्या मंडळींचं लक्ष असतं. सध्याच्या काळात विवाह सोहळ्यासोबतच फोटोशूटलाही (Pre-wedding Photoshoot) महत्त्व प्राप्त झालं आहे.
विवाहापूर्वीचे आणि विवाहसोहळा प्रत्यक्ष होतानाचे क्षण कॅमेरात टिपण्यासाठी हजारो रुपये खर्च केले जातात. हे क्षण टिपण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो तो फोटोग्राफर (Photographer). अशाच एका लग्नसोहळ्यात घडलेला अनोखा प्रकार सध्या चर्चेत आहे. एका विवाहसोहळ्यात फोटोग्राफी करण्यासाठी गेलेल्या फोटोग्राफरला जेवण देण्यास नवरदेवानं नकार दिला. जेवण न मिळाल्यानं फोटोग्राफर संतप्त झाला आणि त्यानं नवरदेवाला चांगलाच धडा शिकवला.
मद्यधुंद बॉयफ्रेंडसोबत Sex करणं महिलेच्या जीवावर, गळा दाबून केली हत्या
एक फोटोग्राफर त्याच्या मित्राच्या विवाहाचं फोटोशूट करण्यासाठी गेला होता. 250 डॉलर म्हणजेच 18 हजार रुपये एवढं मानधन या फोटोशूटसाठी ठरलं होतं. विवाहाच्या दिवशी सकाळी 11 वाजता फोटोग्राफरनं काम सुरू केलं. हे फोटोशूट रात्री 8 वाजेपर्यंत चालणार होतं. भोजनाची वेळ सायंकाळी 5 वाजता ठेवण्यात आली होती. दिवसभर काम करून थकल्याने फोटोग्राफर जेव्हा जेवायला गेला, तेव्हा नवरदेव त्याच्यावर संतापला.
`तुला फोटो काढायचे आहेत. त्यामुळे तू जेवू नकोस,` असं नवरदेवानं (Groom) फोटोग्राफरला सुनावलं. `मला जेवणासाठी 20 मिनिटांचा ब्रेक हवा आहे,` असं फोटोग्राफरनं सांगूनही नवरदेवानं त्यास मनाई केली. `एक तर तू फोटोग्राफी कर किंवा पैसे न घेता घरी निघून जा,` असं फर्मान नवरदेवानं काढलं. यावर फोटोग्राफर खूप संतापला आणि त्याने विवाहादरम्यान काढलेले सर्व फोटो नवरदेवासमोरच डिलीट (Delete) केले. 'मी आता तुझा फोटोग्राफर नाही,' असं सांगून फोटोग्राफर तिथून निघून गेला.
रेडिट (Reddit) या सोशल मीडिया साइटवर या फोटोग्राफरची घटनेविषयीची पोस्ट व्हायरल झाली. त्यात त्यानं विवाहप्रसंगी घडलेला सर्व प्रकार कथन केला आहे. `मी फोटोग्राफर नसून मी एक डॉग ग्रूमर (Dog Groomer) म्हणजेच कुत्र्यांची देखभाल करतो . फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्रामसाठी (Instagram) मी कुत्र्यांचे फोटो काढतो. माझ्या मित्राचं लग्न होतं. हा सोहळा कमी खर्चात पार पाडायचा असल्यानं माझ्या मित्रानं मला विवाहाचे फोटो काढण्यासाठी सांगितले. मला हे फोटोशूट जमणार नाही, असं मी त्याला वारंवार सांगूनही त्यानं माझं ऐकलं नाही आणि मला फोटोशूटसाठी भाग पाडलं. विवाहाच्या दिवशी दिवसभर फोटोशूट करून मी खूप थकलो होतो. विवाहस्थळी एसी नसल्यानं उकाड्यामुळे मी घामाघूम झालो होतो. विवाहस्थळी पिण्यासाठी पाण्याची व्यवस्थादेखील नीट नव्हती. काही वेळ ब्रेक घेऊन मी जेवायला बसलो होतो, तेव्हा माझ्या मित्रानं म्हणजेच नवरदेवानं मला जेवण्यापासून रोखलं. त्यावर मी संतापलो आणि त्याच्यासमोरच विवाहाचे सर्व फोटो डिलीट करून तिथून निघून आलो,` असं फोटोग्राफरनं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सध्या या फोटोग्राफरची पोस्ट व्हायरल होत असून, त्याने नवरदेवाला शिकवलेला धडा चर्चेचा विषय ठरला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pre wedding photo shoot, Viral