मराठी बातम्या /बातम्या /Viral /आमचे दात येत नाहीयेत, काहीतरी करा म्हणणाऱ्या चिमुकल्यांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं उत्तर आलं; म्हणाले..

आमचे दात येत नाहीयेत, काहीतरी करा म्हणणाऱ्या चिमुकल्यांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं उत्तर आलं; म्हणाले..

या चिमुकल्यांनी चक्क आपल्याला दात येत नाहीत (Assam kids letter about teeth), यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं (Assam Siblings Letter to PM Naendra modi). या पत्राला आता मुुख्यमंत्र्यांचे उत्तर आले आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 30 सप्टेंबर : लहान मुलं कधी काय करतील याचा नेम नाही. काही झालं की देवबाप्पाकडे गाऱ्हाणं मांडणाऱ्या या चिमुकल्यांनी आता चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेच आपली समस्या मांडली आहे. ही समस्यासुद्धा अशी की जी वाचून आपल्याला हसू येतं. पण या चिमुकल्यांचा निरागसपणा, त्यांचा क्युटनेस काळजाला भिडतो. या चिमुकल्यांनी चक्क आपल्याला दात येत नाहीत (Assam kids letter about teeth), यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं (Assam Siblings Letter to PM Naendra modi). या पत्राला आता मुुख्यमंत्र्यांचे उत्तर आले आहे.

आसाममधील दोन चिमुकल्यांचं पत्र (Assam Siblings Letter) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांना पत्र लिहिलं आहे. पत्रात त्यांनी आपली दातांची समस्या मांडली आहे. सोशल मीडियावर चांगलेच शेअर होत असलेल्या या पत्रावर अखेर मुख्यमंत्री हिमंत बिस्वा यांचं उत्तर आलं आहे.

हे वाचा - पाकिस्तानात रस्त्यावर सरबत पितोय रोहित शर्मा? नेटकऱ्यांनी Mumbai Indians ची उडवली खिल्ली

6 वर्षांची रईसा रावजा अहमद आणि 5 वर्षांचा आर्यन अहमद. या दोन्ही भावंडांचे दात पडले आहेत. त्यांचे समोरील दात पडले आहेत. जे लवकर येत नाही आहेत. दात यायला वेळ लागत असल्याने त्यांना खायला त्रास होतो आहे. आवडीचे पदार्थ नीट खाता येत नाहीयेत, असं त्यांनी नमूद केलं आहे.

'प्रिय मोदी जी... माझे दात येत नाही आहेत. यामुळे मला जेवण चावताना समस्या होत आहे. कृपया आवश्यक ती कारवाई करावी', असं या पत्रात म्हटलं आहे. सोबतच या पत्रावर दातांचं छोटंसं चित्रही काढण्यात आलं आहे.

हे वाचा - खरोखरचं Man vs Wild! घराबाहेर आलेल्या मगरीला पकडण्याचा थरार कॅमेरात कैद, Video Viral

या मुलांचं हे पत्र त्यांचे काका मुख्तार अहमद यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केलं आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.

मुख्यमंत्री हिमंत बिस्वा यांचं पत्राला आलं उत्तर

हिमंत बिस्वा सरमा यांनी सहा वर्षांच्या रईसा रावजा अहमद आणि पाच वर्षीय आर्यन अहमद यांनी लिहिलेल्या पत्राला उत्तर दिले आहे. त्यांनी त्यांचे उत्तर ट्विट केले आहे. त्यांचे हे ट्विटही चांगलेच व्हायरल झाले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा यांनी ट्विट केले, 'तुमच्यासाठी गुवाहाटीमध्ये चांगल्या दंतवैद्याची व्यवस्था करण्यात मला आनंद होईल. जेणेकरून आपण एकत्र तुमच्या आवडत्या जेवणाचा आनंद घेऊ शकू.'

First published:

Tags: Photo viral, Pm modi