मुंबई, 12 मार्च : फोटो ज्यामध्ये बरंच काही दडलेलं असतं. पण एक फोटो काहीतरी सांगत असतो. असे बरेच फोटो एकत्र करून तुम्ही फोटोजपासून व्हिडीओ बनवले असतील. पण सध्या असा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, जो पाहताच क्षणी आपोआप व्हिडीओ बनतो (Photo turns video). एका सेकंदात व्हिडीओ बनणारा हा फोटो चांगलाच चर्चेत आला आहे (Optical illusion). हा फोटो इतर फोटोंपेक्षा खूप वेगळा आहे. फोटो पाहताच तुम्ही हैराण व्हाइल. या फोटोत दोन रंगबेरंगी वर्तुळं आणि त्यांच्या आतील छोट्या वर्तुळा चार बाण आहेत. सुरुवातीला स्थिर असलेला हा फोटो जेव्हा तुम्ही पाहतात तेव्हा लगेच आपोआप हलू लागतो. म्हणजे जी वर्तुळं स्थिर असतात ती गोल गोल फिरताना दिसताना. त्यातील बाणांचीही हालचाल होते. हे कसं शक्य आहे, याचंच आश्चर्य तुम्हाला वाटेल. ट्विटरवर हा फोटो पोस्ट करण्यात आला. पाहताच क्षणी लोक कन्फ्युझ झाले आहेत. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका व्यक्तीने तर हा फोटो पाहिल्यानंतर आपल्या डोक्यात आग लागली आहे, अशीच प्रतिक्रिया दिली आहे. हे वाचा - OMG! हे कसं शक्य आहे? आधाराशिवायच हवेत लटकतेय भलीमोठी चहाची किटली; अद्भुत VIDEO पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा फोटो फोटोच आहे, तो व्हिडीओत बिलकुल बदलला नाही. खरंतर हा फोटो म्हणजे एक ऑप्टिकल इल्युजन म्हणजे दृष्टीभ्रम आहे म्हणजे तुम्ही जे पाहत आहात किंवा तुम्हाला जसं दिसतं आहे तसं अजिबात नाही आहे. हा फोटो रेडिटवरही शेअर करण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना सांगण्यात आलं आहे, या फोटोतील वर्तुळांची हालचाल होत नाही आहे, ते एकाच ठिकाणी स्थिर आहे. पण त्यातील रंग बदलत आहेत. यावर प्रतिक्रिया देत आणखी काही लोकांनी ही लाइट्स आणि रंगाची जादू असून त्यामुळे फोटोला व्हिडीओचा इफेक्ट आला आहे, असं सांगितलं आहे.
あの伝説の錯視をパワーアップさせました pic.twitter.com/SRcE9Y5Cn6
— じゃがりきん (@jagarikin) January 1, 2022
जापानी आर्टिस्ट जागरिकी यांची ही क्रिएटिव्हिटी आहे. त्यांनी या फोटोत असे रंग भरले आहेत आणि त्यातील बाणांची रचना अशी ठेवली आहे, ज्यामुळे संपूर्ण फोटोच आपोआप हलताना दिसतो. या वर्तुळाचा आणि बाणांचा रंग बदलतो आणि फोटो पाहतात तो गोलगोल फिरतो आहे, असंच तुम्हाला वाटतं. हे वाचा - शोधा म्हणजे नक्की सापडेल! सांगा पाहू या PHOTO मध्ये लपला आहे कोणता प्राणी? हा फोटो नेमका कसा आहे, हे पाहायचं असेल तर यातील एक वर्तुळ आपल्या हातांनी झाकून घ्या आणि फक्त एका वर्तुळाकडे पाहा तुम्हाला फोटोचं सत्य नक्कीच समजेल असं सांगितलं आहे.