जाहिरात
मराठी बातम्या / Viral / शोधा म्हणजे नक्की सापडेल! सांगा पाहू या PHOTO मध्ये लपला आहे कोणता प्राणी?

शोधा म्हणजे नक्की सापडेल! सांगा पाहू या PHOTO मध्ये लपला आहे कोणता प्राणी?

शोधा म्हणजे नक्की सापडेल! सांगा पाहू या PHOTO मध्ये लपला आहे कोणता प्राणी?

या फोटोत कुणाला मांजर, कुणाला उंदीर तर कुणाला इतर प्राणी दिसले तुम्हाला या फोटोत कोणता प्राणी दिसतो आहे सांगा.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 मार्च : सोशल मीडिया जिथं व्हिडीओ, फोटोसह गेम, पझल्सही व्हायरल होत असतात.  काही फोटो असे असतात ज्यामध्ये बरंच काही दडलेलं असतं आणि ते शोधण्याचं चॅलेंज दिलं जातं. असा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये प्राणी दडला आहे. हा प्राणी शोधण्याचं आव्हान देण्यात आलं आहे. त्यामुळे हा फोटो पाहणारा प्रत्येक जण यातील प्राणी शोधत आहे (Find animal in photo). हा फोटो म्हणजे एक ऑप्टिकल इल्युजन आहे. म्हणजे दृष्टीभ्रम करणारा हा फोटो आहे. या फोटोत जसं दिसतं तसं नसतं किंवा आपल्याला जे दिसतं त्यापेक्षा काहीतरी वेगळं असतं, यामध्ये असं काही दडलेलं असतं जे आपल्याला डोळ्यांनी सहजासहजी दिसत नाही (Optical Illusion Animal). आता या फोटोत तुम्ही पाहिलं तर डिझाइन आहे. यात पांढरा, काळा आणि जांभळ्या रंगाच्या काही सरळ, काही वक्र रेषा आहेत. फोटो पाहतानाच डोळे भिरतात, चक्कर येते. फोटोकडे एकटक पाहतानाही येत नाही. अशा फोटोतून प्राणी शोधणं म्हणजे कठीणच. पण तरी बरेच लोक प्रयत्न करत आहेत. हे वाचा -  ऑन कॅमेरा फक्त खाऊन महिन्यालाच 7 कोटी कमावते; असं काय आहे हिच्या VIDEOमध्ये पाहा काहींना या फोटोमध्ये मांजर दिसलं, तर काहींना उंदीर दिसलं आहे. काही लोक तर या फोटोत प्राणी शोधून शोधून वैतागले कारण त्यांना यात कोणताच प्राणी दिसला नाही.

News18

टॉम हिक्स नावाच्या ट्विटर युझरने हा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. तुम्हाला यामध्ये मांजर किंवा उंदीर दिसू शकतो. आता तुम्हाला काय दिसणार हे तुमच्या मेंदूच्या कार्यावर अवलंबून आहे, असं त्याने सांगितलं. हे वाचा -  OMG! हँडलवर उभं राहून चालवली सायकल; Cycling Video पाहूनच तोंडात बोटं घालाल याचा अर्थ तुम्हाला या फोटोत जे दिसतं ते या फोटोचा भाग नाही. म्हणजे या फोटोत ते प्रत्यक्षात तसंच आहे असं नाही तर तुमच्या मेंदूचा खेळ आहे. म्हणजे  जरी या फोटोत मांजर, उंदीर दिसेल असं सांगितलं असलं तरी काहींना यामध्ये कोल्हाही दिसला आहे. त्यामुळे तुम्हाला या फोटोत नेमका कोणता प्राणी दिसला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात