नवी दिल्ली 18 फेब्रुवारी : चिंपांझी माणसांसोबत अनेकदा मित्रांप्रमाणे राहतात. मात्र, प्राणी हे प्राणीच असतात. ते कधी काय करतील, हे सांगता येत नाही. सेंड्रा नावाच्या एका महिलेसोबत असंच काहीसं घडलं. तिने ट्रॅविस नावाच्या एका चिंपाझीच्या पिल्लाला आपल्या घरामध्ये ठेवलं. त्याला अगदी पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलं. मात्र अचानक एक दिवस ट्रेविस इतका भयानक रूपात आला की त्याने सेंड्राच्या मैत्रिणीचं आयुष्यच वेगळ्या वळणावर आणलं (Chimpanzee Attacked on Woman). सरप्राईझ कसला हा तर मोठा शॉक! गर्लफ्रेंडने मास्क हटवताच बॉयफ्रेंड हादरला कारण… ट्रेविस नावाच्या या चिंपांझीची आई सेंक्चुअरीमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात मारली गेली होती. त्यावेळी ट्रेविस फक्त तीन दिवसांचा होता. ट्रेविसला सेंड्रा हेराल्ड आणि तिच्या पतीने आपल्यासोबत घरी आणलं. त्याची अगदी पोटच्या मुलाप्रमाणे काळजी घेतली. त्याला माणसाप्रमाणेच कपडेही घातले जात असे. इतकंच नाही तर तो कारही चालवायचा. ट्रेविस सेंड्रा आणि तिच्या पतीसोबत डायनिंग टेबलवर बसूनच जेवण करायचा. अनेकदा तर तो वाईनचा ग्लासही शेअर करत असे. ट्रेविस आणि सेंड्राची जोडी इतकी प्रसिद्ध होती की ट्रेविसला जाहिरातीसाठीही निवडलं गेलं होतं. तिने काही मोठ्या कंपन्यांच्या जाहिरातीही केल्या.
ट्रेविस जेव्हा १४ वर्षाचा झाला तेव्हा तो थोडा आक्रमक झाल्याचं सेंड्राला जाणवलं. ट्रेविसला राग येऊ लागला होता. सेंड्राने त्याला गोळ्याही सुरू केल्या जेणेकरून तो शांत होईल. मात्र हे सर्व त्यावेळी अपयशी ठरलं जेव्हा ट्रेविसने रागात गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि घरातून बाहेर पळून गेला. सेंड्राने मदतीसाठी आपली ५० वर्षीय मैत्रिण कार्ला हिला बोलावलं. ट्रेविस कार्लासोबत चांगला खेळायचा. मात्र अचानक जेव्हा सेंड्रा आपल्या कारमध्ये बसली होती तेव्हा ट्रेविसने कार्लाच्या चेहऱ्यावर हल्ला केला. कार्लाचे दोन्ही हात त्याने खाल्ले. सेंड्राने घाबरून पोलिसांना फोन केला.
आश्चर्य! रस्त्यावरून अचानक हवेत उडू लागली कार; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO
सेंड्राने पोलिसांना फोन केल्यानंतर ट्रेविसच्या तावडीतून कार्लाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रेविस कार्लाला सोडायला तयार नव्हता. सेंड्राने ट्रेविसवर चाकून वार करत त्याला जखमी केलं. यानंतर रागात ट्रेविसने सेंड्राकडेही धाव घेतली. सेंड्रा धावत जात आपल्या कारमध्ये बसली. यामुळे तिचा जीव वाचला. यादरम्यान पोलिसांनी येऊन ट्रेविसवर गोळी झाडली. ट्रेविसच्या हल्ल्यात सेंड्राची मैत्रिण कार्लाचं आयुष्य जवळपास संपूनच टाकलं. कार्लाने आपले डोळे गमावले. अनेकदा सर्जरी करूनही ती अजूनही रिकव्हर झाली नाही. तिचा चेहराही आता ओळखू येत नाही. ती म्हणते की आता आयुष्य जगायची इच्छाही राहिली नाही.

)







