Home /News /lifestyle /

सरप्राईझ कसला हा तर मोठा शॉक! गर्लफ्रेंडने तोंडावरील मास्क हटवताच बॉयफ्रेंड हादरला कारण...

सरप्राईझ कसला हा तर मोठा शॉक! गर्लफ्रेंडने तोंडावरील मास्क हटवताच बॉयफ्रेंड हादरला कारण...

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

महिलेच्या चेहऱ्याची अवस्था पाहून बॉयफ्रेंडला बसला धक्का.

    लंडन, 17 फेब्रुवारी : आपल्या जोडीदाराला काही ना काही सरप्राईझ द्यायला काही जणांना आवडतं. एक तरुणीही आपल्या बॉयफ्रेंडला असंच सरप्राईझ द्यायला गेली, पण तिचं हे सरप्राईझ म्हणजे तिच्या बॉयफ्रेंडसाठी मोठा शॉक होता. गर्लफ्रेंडने आपल्या चेहऱ्यावरील मास्क हटवला आणि असं काही दिसलं की बॉयफ्रेंड हादरला (Boyfriend was shocked to saw her swollen lips). यूकेतील बोर्नमाऊथच्या डोरसेटमध्ये राहणारी 25 वर्षांची क्लिओ सिम्स (Cleo Symes). आपल्या बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली. तसं कोरोनाच्या काळात मास्क घालणं बंधनकारक आहेच. पण तरी क्लिओने आपल्या या चेहऱ्यावरील मास्कच्या आत आपल्या बॉयफ्रेंडसाठी एक सरप्राईझ लपवलं होतं. काही वेळाने तिने आपल्या चेहऱ्यावरील मास्क हटवला. बॉयफ्रेंडने तिचा चेहरा पाहिला तेव्हा त्याला आधी धक्का बसला पण नंतर हसूही आवरलं नाही. आता क्लिओच्या चेहऱ्यावर असं नक्की होतं तरी काय, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. क्लिओने काही वर्षांपूर्वी ओठ अधिक सुंदर बनवण्यासाठी ट्रिटमेंट केली होती. ती बरी करण्याच्या नादात तिची अवस्था आणखी भयंकर झाली. हे वाचा - फिल्मी कॅरेक्टर नाही प्रत्यक्षात आहे ही व्यक्ती; विचित्र शरीर तिच्यासाठी वरदान तिला तिच्या ओठांचा आकार लहान वाटला. त्यामुळे तिने ओठांवर फिलर इंजेक्शन घेऊन त्यांचा आकार बदलला. पण त्यानंतर त्याचा जो परिणाम समोर आला तो पाहून ती स्वतःही घाबरली. तिचा चेहरा पाहून तिचे मित्रमैत्रिणी हसू लागले. आता तिला आपला आधीचा चेहरा पुन्हा हवा आहे. यासाठी तिने लिप फिलर डिझॉल्वह करायला सुरुवात केली. पण या प्रक्रियेचा इतका भयंकर परिणाम झाला की तिचे ओठ फुग्यासारखे फुगले. तिचा चेहरा माकडासारखा वाटू लागला. फिलर डिझॉल्व्ह केल्यानंतर तिने आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. जे पाहून नेटिझन्स शॉक झाले आहेत. लिप फिलर डिझॉल्व्ह केल्यानंतर तिने आपल्या बॉयफ्रेंडला सरप्राइझ देण्याचा प्लॅन केला. त्याच्यासोबत ती आधी मास्क घालून फिरायला गेली. जसं तिने आपला मास्क हटवला तसा तिचा ओठ पाहून तो सरप्राईझ होण्याऐवजी शॉक झाला. हे वाचा - OMG! हे कसं शक्य आहे? महिलेच्या चक्क काखेतून निघतं दूध पण क्लिओ खचली नाही. तिने आपले ओठ पूर्वीसारखे होण्यासाठी प्रतीक्षा केली. हळूहळू तिचे ओठ आधीसारखे सामान्य आकारात आले, तेव्हा कुठे तिला दिलासा मिळाला. ओठ सामान्य झाल्यानंतर तिने आपला व्हिडओ शेअर केला. तसंच इतर युझर्सनाही असे काही उपचार करू नका म्हणून सल्ला दिला.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Beauty tips, Lifestyle, Viral

    पुढील बातम्या