जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पाळीव मांजरीचा मालकावरच भयानक हल्ला; शेवटपर्यंत सोडलं नाही, थरारक घटनेचा Video

पाळीव मांजरीचा मालकावरच भयानक हल्ला; शेवटपर्यंत सोडलं नाही, थरारक घटनेचा Video

मांजरीचा मालकावर हल्ला

मांजरीचा मालकावर हल्ला

सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मांजर आपल्या मालकावर हल्ला करताना दिसत आहे. भुकेलेला सिंह आपल्या भक्ष्यावर वार करतो तशी ती आपल्या मालकाला चावायला धावत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 12 जुलै : पाळीव प्राणी माणसांना खूप प्रिय असतात. अनेक लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठी काहीही करायला तयार असतात. पण कधी कधी पाळीव प्राणी अचानक हिंसक होतात. यावेळी ते मालकावरही हल्ला करायला मागेपुढे पाहत नाहीत. भारतात काही दिवसांपूर्वीच पाळीव पिटबुलच्या हल्ल्याची जोरदार चर्चा झाली, ज्याने आपल्या मालकिनीचा जीव घेतला. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मांजर आपल्या मालकावर हल्ला करताना दिसत आहे. भुकेलेला सिंह आपल्या भक्ष्यावर वार करतो तशी ती आपल्या मालकाला चावायला धावत आहे. @crazyclipsonly या ट्विटर अकाऊंटवर अनेकदा आश्चर्यकारक व्हिडिओ पोस्ट केले जातात. नुकतंच या अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक मांजर तिच्या मालकावर हल्ला करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की - “मालकावर मांजरीने अचानक हल्ला केला!”

जाहिरात

व्हायरल व्हिडिओमध्ये लाल टी-शर्ट घातलेला तरुण घरात काहीतरी काम करत असल्याचं दिसत आहे. जवळच एक मांजरही आहे. खोलीत एक तरुणी देखील आहे. अचानक पाळीव मांजर तरुणावर हल्ला करू लागते. मांजरीने त्या तरुणाचा पाय धरला आणि मग दातांनी चावायला सुरुवात केली. तरुण घाबरून इकडे तिकडे पळू लागतो, पण मांजर अजिबात दया दाखवत नाही. ती स्वतःच्या मालकाच्या मागे का लागली आहे, असा प्रश्न पडतो. मालक तिच्याासून वाचण्यासाठी घरात इकडे तिकडे धावताना दिसतो, पण मांजर मात्र त्याच्या मागे धावत राहाते. Photo Viral : किंग कोब्रा आणि अजगरमध्ये भीषण लढाई, शेवट मात्र धक्कादायक खोलीत असलेली तरुणीही घाबरून टेबलावर चढते आणि मांजरीने डब्याखाली पकडण्याचा प्रयत्न करते. या व्हिडिओला 3 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने म्हटलं, की ती वस्तू सरकण्याच्या आवाजाने मांजर भडकलं असेल. दुसऱ्याने सांगितलं, की याच कारणामुळे तो कुत्रा पाळतो. आणखी एकाने म्हटलं, आजकाल मांजराच्या हल्ल्यात लोक गंभीर जखमी झाल्याचं खूप ऐकायला मिळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात