जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO : ट्रकचालकाच्या हॉर्नमधून ऐकू आली ‘ही’ धून, लोकांनी भररस्त्यात थांबवत म्हटलं 'फिरसे बजाओ...'

VIDEO : ट्रकचालकाच्या हॉर्नमधून ऐकू आली ‘ही’ धून, लोकांनी भररस्त्यात थांबवत म्हटलं 'फिरसे बजाओ...'

VIDEO : ट्रकचालकाच्या हॉर्नमधून ऐकू आली ‘ही’ धून, लोकांनी भररस्त्यात थांबवत म्हटलं 'फिरसे बजाओ...'

‘हे फक्त भारतातच होऊ शकतं’ (This can happen only in India) असं वाक्य आपण अनेकदा ऐकत असतो आणि हे वाक्य तितकच खरही आहे. भोपाळमध्ये ट्रक मध्येच थांबवत लोकांनी ट्रकचालकाला परत परत हॉर्न वाजवण्याची विनंती केली.

  • -MIN READ
  • Last Updated :

भोपाळ, 27 फेब्रुवारी :  ‘हे फक्त भारतातच होऊ शकतं’ (This can happen only in India) असं वाक्य आपण अनेकदा ऐकत असतो आणि हे वाक्य तितकच खरही आहे. भारतात कधी आणि काय होऊ शकतं याचा काही नेम नाही. अगदी कोणत्याही गोष्टीतून लोकांना आनंद मिळू शकतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओला 82 हजार लोकांनी पाहिला आहे. हजारो कमेंट्सही आल्या आहेत. हा व्हिडीओ एवढा लोकप्रिय होण्याचं कारणही तसच आहे. आपल्या गाडीवर प्रेम करणारी अनेक माणसं असतात. असच आपल्या ट्रकवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या ट्रकच्या हॉर्नला एक वेगळी धून लावली आहे. त्याने हॉर्न वाजवला ही वाजणारी धून अनेकांचं लक्ष्य वेधून घेणारी आहे. (हेही वाचा- VIDEO : कोरोनाचा कहर असतानाही रुग्णालयातील परिचारिकांनी का केला डान्स? ) या ट्रकचालकाने प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या ‘प्रतिज्ञा’ (1975) या चित्रपटातील गाण्याची धून या हॉर्नला आहे. ‘मैं जट यमला पगला दिवाना’ हेच ते गाणं. हे गाणं आजही तुमच्या ओठी असेल. त्यामुळे त्याचा हा हॉर्न रस्त्याच्या आजुबाजुला असलेल्या सर्वांच्याच पसंतीस उतरला.

जाहिरात

हा व्हिडीओ भोपाळमधील असून आजुबाजुची गर्दी हॉर्न वाजवणाऱ्या इसमाला ‘पुन्हा एकदा हॉर्न वाजव’ अशी विनंती करत आहेत आणि ते सुद्धा त्याचा ट्रक भर रस्त्यात थांबवून! त्या बिचाऱ्याला ट्रक भर रस्त्यामध्ये थांबवून हॉर्न वाजवावा लागला. या गर्दीतीलच कुणीतरी हा व्हिडीओ चित्रित केला आहे. एका ट्विटर युजरने हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर त्यावर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. ‘लग्नात डीजेऐवजी हा हॉर्न वाजवा’, ‘हे फक्त भारतातच होऊ शकतं’, अशा हास्यास्पद कमेंट्समुळे व्हिडीओ पाहताना आणखीनच हसू येतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात