VIDEO : कोरोनाचा कहर असतानाही रुग्णालयातील परिचारिकांनी का केला डान्स?

VIDEO : कोरोनाचा कहर असतानाही रुग्णालयातील परिचारिकांनी का केला डान्स?

कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजला असतानाच सोशल मीडियावर दोन परिचारिका आनंदानं डान्स करत असल्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

  • Share this:

वुहान, 27 फेब्रुवारी : कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजला असतानाच सोशल मीडियावर दोन परिचारिका आनंदानं डान्स करत असल्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. एकीकडे कोरोना वायरसची लागण होत असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळत असतानाचा चीनमधील रुग्णालयात आनंद साजरा केला जात आहे. याचं कारण म्हणजे कोरोना बाधित रुग्णांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. 6 कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती सुधारत असल्यानं परिचारिकांनी आनंद व्यक्त केला आहे. या परिचारिकांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडिओला आतापर्यंत एक हजार 500 लोकांनी लाईक केला आहे. तर 300हून अधिक युझर्सनी कमेंट्स केल्या आहेत. 25 फेब्रुवारीला परिचारिकांच्या डान्सचा हा व्हिडिओ ट्वीट कऱण्यात आला होता.

कोरोना सारख्या भयानक संसर्गजन्य रोगापासून 6 रुग्णांची प्रकृती सुधारत असल्याचा हा आनंद रुग्णालयातील परिचारिकांनी साजरा केला आहे. युझर्सनीही धीर देत सगळं काही ठीक होईल अशी आशा व्यक्त केली आहे. या परिचारिकांचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

First published: February 27, 2020, 12:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading