मुंबई 26 जानेवारी : भारतीयांचं आवडतं पेय चहा आहे. आपल्या देशात असे अनेक लोक आहेत, ज्यांना सकाळी उठल्या उठल्या चहा लागतो. असे देखील काही लोक आहेत, ज्यांचा काही कारणामुळे सकाळचा चहा चुकला तर दिवस चांगला जात नाही. यासगळ्यात तुम्हाला फार असे कमी लोक दिसतील जे चहा पित नाहीत किंवा त्यांच्या घरी चहा बनवला जात नाही. प्रत्येकाची चहा पिण्याची आणि बनवण्याची पद्धत वेगळी आहे. कोणी दुधाचा चहा पितं, तर कोणी विना दुधाचा, कोणी आलं घालून चहा पितं, तर कुणी गवती चहा. पण तुम्हाला जर म्हटलं की तांदळाचा चहा देखील असतो, तर तुमचा विश्वास बसेल? ऐकूनच तुम्हाला विश्वास ठेवणं कठीण झालं असेल आणि हा प्रकार असतो तरी काय असं तुमच्या मनात आलं असेल. हे ही पाहा : ‘‘मला अजून जगायचय….’’ असं हातावर लिहित महिलनं घेतला टोकाचा निर्णय, नक्की असं काय घडलं? झारखंडची राजधानी असलेल्या रांची येथील अनेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात तांदळाचा चहा पिऊन करतात. भाताचा चहा बनवण्याची पद्धतही थोडी वेगळी आहे. त्यात साखर, मीठ किंवा गूळ मिसळून चहा बनवला जातो. ही एक कॉमन पद्धत आहे. पण रांचीच्या फील्ड आणि फॉरेस्ट कॅफेचे संचालक कपिल सांगतात की, रांचीमध्ये तांदळाचा चहा खूप प्रसिद्ध आहे. यात लाल तांदूळ वापरला जातो. या चहाची खास गोष्ट म्हणजे या चहामुळे पोटाचे अनेक आजार बरे होतात, ज्यामुळे ते येथील आदिवासींचे आवडते पेय आहे. तांदळाचा चहा कसा बनवायचा कपिल सांगतात की तांदळाचा चहा बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात थोडे लाल तांदूळ ठेवा आणि ते आणखी लाल किंवा काळे होईपर्यंत भाजून घ्या, नंतर 2 किंवा 3 कप पाणी घाला आणि चांगले उकळा. वास्तविक लाल तांदूळ आपल्यासाठी चहाच्या पानाचे काम करतो, त्यानंतर त्यात आले, तमालपत्र आणि गूळ घालून २ मिनिटे शिजू द्या आणि तांदळाचा चहा तयार आहे. तरुणाची अजब कला, शब्दापासून बनवला सुंदर ताजमहाल, Video Viral तांदळाच्या चहाचे अनेक फायदे तांदळाच्या चहाचे असंख्य फायदे आहेत. लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम फॉस्फरस, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 12, सी अशी अनेक खनिजे लाल तांदळात आढळतात, ज्यामुळे मानवी पेशी स्वच्छ आणि हाडे मजबूत होतात. वजन कमी होण्यास मदत होते, त्यात मीठ टाकूनही सेवन करता येते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय आहे. पोटातील जंतांपासून ते बद्धकोष्ठतेपर्यंतच्या समस्यांवर तांदळाचा चहा हा एकमेव उपाय आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.