पेनिसिल्व्हेनिया, 04 मार्च: एखादी व्यक्ती छंदासाठी (Hobby) काय म्हणून करत नाही? या महिलेच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. प्रयत्न करूनही तिचं लहानपणापासून जे स्वप्न होतं, ते ती मोठी होईपर्यंतही पूर्ण करू शकलेली नाही. त्यामुळे तिला आता कोणत्याही परिस्थितीत तिचं स्वप्न आणि छंद पूर्ण करायचे आहेत. पण या मार्गात सर्वांत मोठा अडथळा होता तो पैशांचा. पैशांची उणीव भरून काढण्यासाठी एका महिलेनं असं पाऊल उचललं की ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. गरजूंसाठी रक्तदान करणारे अनेक जण असतात. अमेरिकेतील पेनिसिल्व्हेनियामध्ये (Pennsylvania) राहणारी लीझ ग्रॅमलिच (Liz Gramlich) रक्ताचा वापर करून प्रवासाचा छंद पूर्ण करत आहे. 28 वर्षांच्या लीझने डिस्ने वर्ल्डमध्ये फिरायला जाण्यासाठी रक्त विकण्याचा आणि त्यातून प्रवासाचा खर्च भागवण्याचा निर्णय घेतला. आपलं स्वप्न पूर्ण करण्यात पैशांचा अडथळा येऊ नये, यासाठी लीझने आठवड्यातून दोन वेळा प्लाझ्मा दान (Plasma Donate) करण्याचं ठरवलं. हे वाचा- शिक्षक असावा तर असा! होमवर्क न करणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थिनीला ‘गोड शिक्षा’ कोविडच्या साथीमुळे ग्रॅमलिचचा प्रवास हुकला लीझला डिस्ने वर्ल्ड ट्रिपचं (Disney World Trip) विलक्षण आकर्षण आहे. 2020 च्या उन्हाळ्यापासून तिनं ऑरलँडो आणि फ्लोरिडाला सुमारे 15 वेळा भेट दिली आहे आणि 2022 मध्ये दर महिन्याला येथे किमान एकदा भेट देण्याची तिची योजना आहे. अर्थात पेनिसिल्व्हेनिया ते फ्लोरिडा असा प्रवास दर महिन्याला करणं तितकं सोपं आणि स्वस्त नाही. त्यामुळे आपला हा छंद पूर्ण करण्यासाठी तिनं आपलं रक्त विकण्याचा बेत आखला. वास्तविकपणे ग्रॅमलिच लहानपणी एकदा डिस्ने वर्ल्ड ट्रिपला गेली होती, पण तिला पुन्हा तिथं जायचं आहे. तिचा हा छंद तिनं 2020 मध्ये पूर्ण केला. पण कोरोनाच्या साथीमुळे सर्व काही ठप्प झाल्यानं तिची योजना अर्ध्यावर राहिली. त्यामुळे 2022 मध्ये तिनं दर महिन्याला इथं येण्याचा निर्णय घेतला. हे वाचा- 44 व्या वर्षी पती गमावला; कॅन्सरचाही केला सामना, 53 व्या वर्षी पुन्हा झालं प्रेम प्लाझ्मा दान करून होतोय असा फायदा ग्रॅमलिच डिस्ने वर्ल्डची पासहोल्डर असली तरी, तिथं ये-जा करण्यासाठी विमानाची तिकिटं, हॉटेलमध्ये राहणं आणि खाण्या-पिण्याची व्यवस्था करणं ही मोठी आव्हानं तिच्यासमोर होती. दुसरीकडे ग्रॅमलिच नेहमीच प्लाझ्मा दान करत आली आहे. पण त्यामुळे होणाऱ्या फायद्याकडे तिनं कधी फारसं लक्ष दिलं नाही. पण यातून कमाई केल्यास गरज पूर्ण होऊ शकते आणि प्लाझ्मामुळे दुसऱ्यालाही जीवदान मिळतं, असं तिला वाटू लागलं. अशा परिस्थितीत तिनं वारंवार प्लाझ्मा दान करण्याबाबत विचार केला आणि आठवड्यातून दोनदा रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. आठवड्यातून दोन वेळा प्लाझ्मा दान करून ती 56,823 रुपये ते 94,662 रुपये कमवत होती. या रकमेतील बहुतांश हिस्सा थीम पार्कसाठी (Theme Park) खर्च करण्याचा निर्णय तिनं घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.