मुंबई, 04 मार्च : अभ्यास केला नाही, होमवर्क केला नाही की शिक्षक शिक्षा करतात. हातावर पट्टीचे मार, उठाबशा काढणं किंवा पाठीवर पट्टी ठेवून ओणवं उभं करणं अशा शिक्षा दिल्या जातात. पण सध्या अशा शिक्षिकेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जिने आपल्या विद्यार्थिनीला गोड शिक्षा दिली आहे. हा व्हिडीओ पाहून बहुतेकांना शिक्षक असावा तर असा असंच वाटत आहे. कोरोना काळात आता हळूहळू शाळा सुरू झाल्या आहेत. मुलं शाळेत जाऊ लागली आहेत. अशात शाळेतील या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका शिक्षिकेचा आणि विद्यार्थिनीचा हा व्हिडीओ आहे. छोट्याशा मुलीने आपला होमवर्क केला नाही. पण तरी ही शिक्षिका तिला ओरडली नाही किंवा तिने तिला मारलं नाही. पण तरी तिने त्या मुलीला इतकी गोड शिक्षा दिली की मुलगी होमवर्क करायला तयार झाली. व्हिडीओत पाहू शकता एक निरागस चिमुकली शाळेत बसली आहे. तिने होम वर्क केला नाही. शिक्षिका तिला होमवर्क का केला नाही म्हणून विचारतात. आता आपल्याला टिचर मारणार म्हणून ती मुलगी आधीच घाबरली आहे. तिच्या डोळ्यात पाणीही दिसतं आहे. पण शिक्षिकेने तिला अशा पद्धतीने अभ्यासाचं महत्त्व समजावून सांगितलं की तिची भीती काही क्षणातच दूर झाली. तिच्या चेहऱ्यावर हसूही फुललं. हे वाचा - लेकाला वाचवण्यासाठी चवताळलेल्या बैलासमोर आला बाबा आणि…; धडकी भरवणारा VIDEO व्हिडीओतील संवाद तुम्ही ऐकाल तर मुलगी आपण अभ्यास का केलं नाही याचं कारण सांगते. शिक्षिकाही तिचं कारण शांतपणे ऐकून घेतात आणि तिला त्यावर उपायही देतात. हा संवाद खूपच गोड आहे. ही गोड शिक्षा आहे असं म्हणण्यासही हरकत नाही.
बच्ची का होम वर्क नहीं हुआ था. टीचर ने झुंझलाने, डांटने की बजाय प्यार से समझा कर चेहरे पर मुस्कान सजा दी और होमवर्क करने की सीख भी दी.
— Dipanshu Kabra (@ipskabra) March 2, 2022
बेहद खूबसूरत व मासूम संवाद... ज़रूर सुनें.
Excellent work by teacher. pic.twitter.com/WLirxYbyqP
आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. मुलीचा होमवर्क झाला नव्हता. शिक्षिकेने तिला मारणं,ओरडण्याऐवजी प्रेमाने समजावून तिला हसण्याची शिक्षा दिली आणि होमवर्क करण्याचा धडाही दिला. खूप सुंदर आणि निरागस असा हा संवाद आहे, जरूर ऐका. असं त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट करताना म्हटलं आहे. हे वाचा - पुरामुळे झाली ताटातूट! आईसाठी कासावीस झालेल्या लेकीने ओलांडला ‘मृत्यूचा पूल’ जवळपास दोन मिनिटांचा हा व्हिडीओ आहे. विद्यार्थ्यांना समजवण्याचं शिक्षिकेची पद्धत नेटिझन्सना आवडली आहे. असे शिक्षक हवेत अशी प्रतिक्रिया बहुतेक नेटिझन्सनी दिली आहे. सर्व शिक्षकांनी असंच करायला असं मत त्यांनी व्यक्त केलं.