14 एप्रिलनंतर रेल्वेचे तिकीट बुक केलं आहात? जाणून घ्या काय आहे रेल्वेचं नियोजन

14 एप्रिलनंतर रेल्वेचे तिकीट बुक केलं आहात? जाणून घ्या काय आहे रेल्वेचं नियोजन

14 एप्रिलला लॉकडाऊन संपेल या आशेने अनेक जणांनी 15 एप्रिलपासून रेल्वे तिकिटांचे बुकिंग केले आहे. लॉकडाऊन वाढल्यास रेल्वे प्रवासाबाबत कोणता निर्णय घेण्यात येईल, याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 एप्रिल : कोरोना व्हायरसच्या परिस्थितीशी लढण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 25 मार्च ते 14 एप्रिल असा 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र देशातील सध्याची परिस्थिती पाहता हा लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाण्याची शक्यता आहे. मात्र 14 एप्रिलला लॉकडाऊन संपेल या आशेने अनेक जणांनी 15 एप्रिलपासून रेल्वे तिकिटांचे बुकिंग केले आहे. लॉकडाऊन वाढल्यास रेल्वे प्रवासाबाबत कोणता निर्णय घेण्यात येईल, याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

(हे वाचा-COVID-19 : 'या' कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मोठा झटका, पगारात होणार 35 टक्के कपात)

सूत्रांच्या माहितीनुसार, देशातील नागरिक पुन्हा एकदा ट्रेनचा प्रवास सुरू करू शकतील का याबाबत कोणतीच स्पष्टता नाही आहे. त्यामुळे जोपर्यंत सरकारकडून हे स्पष्टीकरण येत नाही तोपर्यंतचे रेल्वे तिकिट रद्द करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे आगाऊ तिकिट बुकिंगसंदर्भात देखील सरकारमध्ये रविवारी चर्चा झाली आहे. परिवहन आणि सप्लाय चेन संबंधित मुद्द्यांवर एका उच्च स्तरीय समीक्षा बैठकीत ही चर्चा झाली. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहलावानुसार लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात आणि इतर सर्व सेवा सुरू करण्याची परवानगी देण्याबाबत लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. मात्र ज्यांनी आधीच बुकिंग करून ठेवले आहे, त्यासंदर्भात रेल्वेकडून लवकरात लवकर निर्णय घेणे अपेक्षित आहे.

IRCTC सुविधा शुल्क परत करत नाही

रेल्वेने 14 एप्रिलनंतर आगाऊ बुकिंग (Advance Ticket Booking) सुरू ठेवल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण देशभरातील इतर वाहतूक व्यवस्थाचं बुकिंग 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. त्यातच एका मीडिया रिपोर्टनुसार IRCTC वरून तिकीट बुक केल्यास तुम्हाला सुविधा शुल्क (Convenience Charges) परत मिळत नाही. यावर रेल्वेने असं स्पष्टीकरण दिले आहे की, तिकीटांवर आकारण्यात येणारे सुविधा शुल्क अत्यल्प असते. नॉन एसी साठी15 रुपये तर एसी आणि फर्स्ट क्लाससाठी 30 रुपये इतकच शुल्क आकारण्यात येते.  त्याचप्रमाणे IRCTC वर तुम्ही कुठुनही बुकिंग करू शकता. शिवाय एका तिकीटात जास्तीत जास्त 6 जणांचे बुकिंग होऊ शकते. यावेळी प्रति व्यक्तीमागे शुल्क न आकारता प्रत्येक तिकिटामागे शुल्क आकारण्यात येते.

संपादन- जान्हवी भाटकर

First published: April 13, 2020, 3:43 PM IST

ताज्या बातम्या