मेक्सिको सिटी, 13 एप्रिल : कोरोनाव्हायरसने जगभरात हाहाकार माजला आहे. या सगळ्यात एक ह्यदयद्रावक बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी मेक्सिको-अमेरिका सीमेवर एका गर्भवती महिलेला ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतल्यानंतर या गर्भवती महिलेला प्रसुती कळा सुरू झाल्या. मात्र तिच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. उपस्थित सैनिकांनी तिला मदत केली आहे, अखेर या महिलेला कळा सहन न झाल्याने तीनं उभ्यानेच बाळाला जन्म दिला. या घटनेने संपूर्ण जगाला सुन्न केले.
हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर जगभरातून येथील उपस्थित सैन्यावर टीका केली जात आहे. अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियनच्या माहितीनुसार ही महिला 27 वर्षांची आहे. या महिलेला चुला विस्ता बॉर्डरवर पकडण्यात आले. त्यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना तिने प्रसुती कळा येत असल्याचे सांगितले, मात्र त्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले.
वाचा-लेकीला शेवटचे डोळेभरूनही बघू शकला नाही बाप, चिमुकलीवर आई-वडिलांविना अंत्यसंस्कार
अखेर या महिलेला कळा सहन न झाल्याने जवळच असलेल्या कचऱ्याच्या डब्ब्याला पकडत तिला उभ्यानेच बाळाला जन्म द्यावा लागला. या महिलेने मुलाला जन्म दिला असून, त्याची प्रकृती नाजूक आहे.
वाचा-800 अमेरिकन नागरिकांनी दिला भारत सोडण्यास नकार, 'हे' आहे कारण
वेदनेने महिला किंचाळत असतानाही कोणी तिच्याकडे लक्ष दिले नाही. अखेर तिच्या पतीने महिलेला धीर दिला. दरम्यान या घटनेनंतर मेक्सिको-अमेरिका बॉर्डरवरचे प्रकरण आणखी तापले आहे. लोकांनी उपस्थित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियनच्या वकील मोनिका वाय. लांगारिका यांनी, "अशी वागणूक भयंकर आहे. या महिलेवर वेळीच उपचार व्हायला हवे होते", असे सांगितले. दरम्यान, या महिलेला व तिच्या कुटूंबाला पुन्हा मेक्सिकोमध्ये पाठवण्यात आले आहे.
वाचा-लॉकडाउनमध्ये 'उडता पुणे', गांज्यासाठी तरुणांनी 'जे' केलं ते ऐकून पोलीसही हादरले
संकलन, संपादन-प्रियांका गावडे