मुंबई 20 डिसेंबर : गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खान आणि त्याचा आगामी चित्रपट ‘पठाण’ वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या सिनेमातील गाण्याने अनेक तरुणांना वेड लावलं आहे. या गाण्यामधील शाहरुख आणि दीपिकाच्या लूकची चर्चा होत आहे. पण असं असलं तरी देखील हे गाण आणखी एका गोष्टीमुळे वादात अडकला. ते कारण म्हणजे दीपिकाची भगवी बिकिनी. शाहरुखच्या Pathan मधील नुकतंच समोर आलेलं गाणं Beshram rang मध्ये दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी घातली आहे. पण या दीपिकाच्या बिकिनीमुळे हिंदूच्या भावना दुखावल्या जात आहेत, असा आरोप अनेक हिंदूंकडून केला जात आहे. हे ही पाहा : Viral Video : हा ट्रेकिंगचा व्हिडीओ नाही, जगातील असं गाव जिथे गावकरी नेहमी करतात जिवघेणा प्रवास असो… वाद पुढे चालतच राहिल, पण या सगळ्यात शाहरुखचा एक जुना व्हिडीओ समोर आला आहे. जो पुन्हा एकदा सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आला आहे. या व्हिडीओ अनेकांची मन जिंकली आहेत. तसे पाहाता हा शाहरुखचा फारच जुना व्हिडीओ आहे. पण सध्या सुरु असलेल्या कॉन्ट्रोवर्सिमुळे तो पुन्हा एकदा समोर आला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने शाहरुखला मुसलमान आणि हिंदू धर्माबद्दल प्रश्न विचारला आहे. ज्यामध्ये त्यांनी लोकांच्या मिळत असलेल्या प्रतिक्रियेमधून त्याला काय वाटतं आणि तो हिंदू असता तर त्याचं नाव काय असतं? असा प्रश्न विचारला तेव्हा त्याने जे उत्तर दिलं त्याने नेटकऱ्यांना देखील आश्चर्य वाटलं आहे.
वीडियो पुराना है..पर खूबसूरत है 🌸#ShahRukhKhan #Pathan pic.twitter.com/4blgQeHU8U
— Priya Sinha🇮🇳 (@iPriyaSinha) December 17, 2022
अभिनेता म्हणाला, ‘जर मी हिंदू असतो तर माझं नाव शेखर राधा कृष्णा (SRK) असतं… हे नाव मला आवडलं असतं…’ शाहरुखच्या या उत्तराने त्याच्या फॅन्सची मन पुन्हा एकदा जिंकली.
शाहरुख पुढे म्हणाला, ‘एक कलाकार नेहमी सामाजिक आणि धार्मिक बंधनांच्या पलीकडे विचार करतो. म्हणून तुम्ही मला प्रेमाने कोणत्याही नावाने हाक मारली तरी ते मला आवडेल.’

)







