मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO : वृद्ध जोडप्याचं भांडणं थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं; मग पोलिसांनी जे केलं ते पाहून व्हाल अवाक

VIDEO : वृद्ध जोडप्याचं भांडणं थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं; मग पोलिसांनी जे केलं ते पाहून व्हाल अवाक

हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांना खूप आवडला आहे. आतापर्यंत दहा लाखाहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहेतर सुमारे 45 हजारहून अधिकांनी लाइक केला आहे

    नवी दिल्ली 15 एप्रिल : कौटुंबिक वाद पोलीस स्टेशनपर्यंत (Police Station) पोहोचल्याचं तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. तरूण जोडप्यांची गोष्ट तर सोडा, पण वृद्ध जोडप्यांमधली भांडणही अनेकदा पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचतं. त्यांची भांडणं काही मिनिटांत कशी मिटवायची, हे उत्तर प्रदेश पोलिसांकडून शिकायला हवं. यूपीच्या गोंडा जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या वृद्ध जोडप्याच्या भांडणावर तोडगा काढला आणि त्यांना आनंदात घरी पाठवलं (Elderly Couple Fight). विषारी किंग कोब्राला KISS करायला गेला व्यक्ती; पुढे जे घडलं ते पाहून उडले थरकाप, VIDEO यूपीच्या गोंडा जिल्ह्यातील एका पोलीस स्टेशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Funny Video of Old Couple) होत आहे. व्हिडिओमध्ये पोलीस ठाण्यातच एक आजी-आजोबा एकमेकांना प्रेमाने मोतीचूर लाडू खाऊ घालताना दिसत आहेत. इतकंच नाही तर पोलीस ठाण्यात गंभीर वातावरण नसून सगळेच मनसोक्त हसताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वृद्ध पती-पत्नीला पोलीस ठाण्यात एकमेकांचं तोंड गोड करून हे भांडण मिटवण्यास सांगितल्याचं दिसतं. इन्स्पेक्टर स्वतः सांगतात की तुम्ही एकमेकांना लाडू खाऊ घालून भांडण संपवा. आधी आजी जरा दचकते, पण पोलिसांच्या सांगण्यावरून ती लाडू खायला घालते. मग आजोबा त्यांना लाडू खाऊ घालताना म्हणतात की - हे बघ, माझ्या हाताला चावू नकोस. हे ऐकून संपूर्ण पोलीस स्टेशनमधील लोक हसू लागतात. Viral Video : रागात रिमोट फेकला अन् 'गेम' झाला, काही सेकंदात झालं एक लाखाचं नुकसान ही घटना सचिन कौशिक यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केली आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे – आजी-आजोबांमध्ये भांडण झालं आणि त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं. आता पुढे काय झालं पाहा. हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांना खूप आवडला आहे. आतापर्यंत दहा लाखाहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहेतर सुमारे 45 हजारहून अधिकांनी लाइक केला आहे. यावर लोक निरनिराळ्या कमेंट करून पोलिसांचं कौतुक करत आहेत
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Cute couple, Funny video

    पुढील बातम्या