Home /News /viral /

Viral Video : रागात रिमोट फेकला अन् 'गेम' झाला, काही सेकंदात झालं एक लाखाचं नुकसान

Viral Video : रागात रिमोट फेकला अन् 'गेम' झाला, काही सेकंदात झालं एक लाखाचं नुकसान

सोशल मीडियावर (Social Media) हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्या व्यक्तीला रागीट म्हटलंय. तसंच या महिलेनं अशा रागीट व्यक्तीपासून ताबडतोब दूर जावं, असा सल्लाही दिलाय.

मुंबई, 14 एप्रिल : राग (Anger) आरोग्यासाठी हानिकारक आहे. रागामुळे आयुष्यात अनेक समस्या (Problems) निर्माण होतात. रागामुळे फक्त तुमच्या शरीरातील रक्तदाबच (Blood Pressure) वाढत नाही, तर तो इतर अनेक आजारांना आमंत्रण देतो. अनेकदा रागाच्या भरात एखादी व्यक्ती आपल्या आरोग्यासोबतच स्वतःचं मोठं आर्थिक नुकसान करून घेते. कोणी राग दुसऱ्यावर काढतं तर कोणी स्वतःलाच इजा पोहचवतं. काही जणांना रागात वस्तू फेकण्याची किंवा तोडण्याची सवयदेखील असते. रागात व्यक्ती काय करू शकते, याचं उदाहरण दाखवणारा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये व्हिडीओ गेममध्ये (Video Game) हरल्यानंतर एका व्यक्तीनं स्वतःचंच भयंकर नुकसान करून घेतलंय. सोशल मीडिया साइट ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती घराच्या लिव्हिंग रूममध्ये व्हिडीओ गेम खेळताना दिसत आहे. तो माणूस त्याच्या PS4 वर फिफा मॅच खेळत होता. पण तो सामना हरला. चिडलेल्या व्यक्तीने गेमचा रिमोट (Remote) खाली जमिनीवर आपटला. त्यानंतर जे झालं ते पाहून त्या व्यक्तीने कपाळावर हात मारून घेतला. कारण तो रिमोट थेट त्याच्या टीव्ही स्क्रीनवर (TV Screen) आदळला आणि टीव्ही स्क्रीन खराब झाली. हे बघून त्या माणसाला आपल्याच रागात केलेल्या कृत्याचा पश्चाताप करत डोक्यावर हात मारून घ्यावा लागला. आलिया जाफरीच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. ही महिला 20 वर्षांची आहे. हे सगळं तिच्या पतीसोबत घडलं. व्हिडीओ गेममधली मॅच हरल्यानंतर रागाच्या भरात तिच्या पतीने रिमोट खाली कसा मारला हे तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता. पण रिमोट उडू टीव्हीच्या स्क्रीनवर पडेल असं बिचाऱ्याला स्वप्नातही वाटलं नसेल. जसा रिमोट आदळला तशी टीव्हीची स्क्रीन खराब झाली. आपलं किती नुकसान झालं हे लक्षात येताच तो बसल्या जागी गपगार झाला. सोशल मीडियावर (Social Media) हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्या व्यक्तीला रागीट म्हटलंय. तसंच या महिलेनं अशा रागीट व्यक्तीपासून ताबडतोब दूर जावं, असा सल्लाही दिलाय. मात्र प्रत्युत्तरात महिलेने पतीचा बचाव केला. तिने सांगितले की, तिचा नवरा खूप चांगला माणूस आहे, याशिवाय तो एक चांगला नवरा आणि प्रेमळ पिता आहे. केवळ 15 सेकंदांच्या व्हिडिओच्या आधारे पतीला रागीट किंवा वाईट ठरवणं योग्य नाही. तसंच घरातला खराब झालेला टीव्ही बदलला आहे, असंही महिलेनं सोशल मीडियावर सांगितलं. तुम्हालाही राग येत असेल तर तो कंट्रोल करायला शिका, नाहीतर या व्यक्तीसारखं मोठं नुकसान होऊन खिशाला कात्री लागू शकते.
First published:

Tags: Game, Television

पुढील बातम्या