• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • भारतातील असं गाव जिथं एकही कोविड रुग्ण नाही; कोरोना पोहोचूच शकत नाही कारण...

भारतातील असं गाव जिथं एकही कोविड रुग्ण नाही; कोरोना पोहोचूच शकत नाही कारण...

मध्य प्रदेशाची राजधानी असलेल्या भोपाळपासून (Bhopal) 250 किलोमीटर दूर पाताळकोट गाव (Patalkot Village) आहे.

 • Share this:
  भोपाळ, 19 ऑगस्ट : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) छिंदवाडा जिल्ह्यात एक असं रहस्यमयी गाव आहे, जिथे ना सूर्याची किरणं पोहचत, ना आतापर्यंत तिथे कोरोनाचं प्रकरण आढळलं आहे. छिंदवाडा जिल्ह्यातील रहस्यमयी पाताळकोटकमधील गावात औषधी झाडं, रोपटी आहेत. तसंच गावाच्या चारही बाजूला मोठे खडक आहेत, त्यामुळे थेट सूर्यप्रकाश इथे पोहचू शकत नाही. दऱ्यांमध्ये वसलेल्या या गावामध्ये औषधी वनस्पतींचा खजिना असल्याची माहिती आहे. मध्य प्रदेशाची राजधानी असलेल्या भोपाळपासून (Bhopal) 250 किलोमीटर दूर पाताळकोट गाव (Patalkot Village) आहे. सरकारी आकडेवारीनुसार, पाताळकोटमध्ये 21 गावं आहेत. परंतु इथे काहीच गावं चांगल्या सुस्थितीतील आहेत. इतर ठिकाणी झोपड्या आहेत. भूरिया जमातीचे लोक इथे राहतात. जमिनीपासून 3000 फूट खाली असलेल्या पाताळकोटच्या या गावांमध्ये थेट सूर्यप्रकाश येत नसल्याने दुपारच्या वेळी संध्याकाळ झाल्याचं वाटतं. काही वर्षांपूर्वी गावातील लोक दरीच्या खोल भागातून काही उंचावर येऊन स्थाईक झाले. त्यानंतर आता या गावांमध्ये जवळपास चार ते पाच तासांपर्यंत सूर्यप्रकाश येतो. परंतु अजूनही काही गावांमध्ये सूर्यप्रकाश पोहोचतच नाही.

  या दोघींचं झाडांवर आहे इतकं प्रेम की मुळं आणि पानांसोबत करतात रोमान्स

  संपूर्ण देशात मागील दीड वर्षापासून कोरोनाचा कहर आहे. परंतु पाताळकोटमधील या गावांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. ब्लॉक मेडिकल ऑफिसर डॉक्टर नरेश लोधी यांनी या भागात एकही कोरोना रुग्ण नसल्याची माहिती दिली. बाहेरील लोक इथंपर्यंत पोहचू शकत नसल्याने हेच कोरोना रुग्ण न आढळल्याचं यामागे कारण असू शकतं, असं बोललं जातं. काही वर्षांपूर्वी पाताळकोटच्या गावांमधून बाहेर येण्या-जाण्यासाठी दोरी हा एकमेव आधार असायचा. परंतु आता गावात पोहोचण्यासाठी रस्ते तयार करण्यात आले आहेत. मात्र तरीदेखील गावात पोहोचणं कठीण होतं असल्याची माहिती आहे.
  Published by:Karishma
  First published: