वॉशिंग्टन, 19 ऑगस्ट : प्रेम (Love) ही एक अशी भावना (Feeling) असते की जी लपवता येत नाही. प्रेम कधीही आणि कोणावरही जडू शकतं आणि या भावनेमुळे सगळं जग सुंदर भासू लागतं. प्रेमाला कोणतीही सीमा नसते. अमेरिकेतील (America) अॅनी स्प्रिंकल (Annie Sprinkle) आणि बेथ स्टीफन्स (Beth Stephens) या देखील अशाच आकंठ प्रेमात बुडाल्या आहेत. आपल्याला झाडांविषयी (Trees) खूप प्रेम आहे आणि ते असमान्य आहे, असे या दोघींना 2004 मध्ये जाणवलं. यामुळे 2008 मध्ये त्यांनी झाडांशी विवाह (Marriage) केला. आता या दोघींनी लोकांसमोर त्यांच्या या अनोख्या रिलेशनशिपबाबत (Relationship) खुलासा केला आहे.
अॅनी स्प्रिंकल आणि बेथ स्टीफन्स या दोघींना पृथ्वीविषयी (Earth) निस्सीम प्रेम आहे. या कारणाने त्यांनी झाडांसोबत विवाह केला आहे. या दोघींनी स्वतःला इकोसेक्सश्युअल (Eco sexual) म्हणून घोषित केले आहे. 2008 मध्ये या दोघी 300 लोकांसमक्ष झाडांसोबत विवाहबध्द झाल्या होत्या. हा विवाहसोहळा कॅलिफोर्नियामधील (California) सांताक्रुझमध्ये पार पडला होता. या विवाहाचे फोटो पाहिल्यावर, या दोघींनी झाडांसोबत विवाह का केला असा प्रश्न अनेक लोकांना पडला. मात्र या दोघींच्या या अनोख्या विचाराने अनेकांची मनं जिंकली.
खतरनाक बाइक स्टंट करताना तरुणाचा तोल गेला आणि...; पाहा थरारक VIDEO
या आहेत पृथ्वीप्रेमी
अॅनी स्प्रिंकल आणि बेथ स्टीफन्स या दोघी आम्ही पृथ्वीप्रेमी आहोत आणि आम्ही तिच्यासाठी वेड्या आहोत, असं सांगतात. आपलं नातं अधिक घट्ट करण्यासाठी त्यांनी झाडांसोबत विवाह केला आहे. अॅनी स्प्रिंकल आणि बेथ स्टीफन्स यांची सॅन फ्रान्सिस्कोमधील रुटगर्स युनिव्हर्सिटीत एकमेकींशी ओळख झाली होती. त्यानंतर दोघींनी एकमेकींशी आपल्या पृथ्वी प्रेमाविषयीची बाब शेअर केली होती. आपण माणसांपेक्षा झाडांकडे जास्त आकर्षित होत असल्याचे या दोघींना जाणवले. आपण तरुण मुलांपेक्षा झाडांवर अधिक प्रेम करतो, ही जाणीव त्यांना होताच त्यांनी झाडांसोबत विवाह केला.
दाखवून द्या तुम्हीच आहात हुश्शार! VIDEO मध्ये मधमाश्यांच्या 'राणी'ला शोधा
असा करतात रोमान्स
अॅनी स्प्रिंकल आणि बेथ स्टीफन्स झाडावर मनस्वी प्रेम करतात. पृथ्वीसोबत प्रणय करणाऱ्या या दोघी डोंगर, टेकड्यांविषयी देखील प्रेम व्यक्त करतात. त्या खडकांना मिठी मारतात. धबधब्यांवर प्रेम करतात. पृथ्वीपासून आम्हाला एक प्रकारची शांतता प्राप्त होते. त्या झाडांना मिठी मारुन पायांनी त्यांची मुळे कुरवाळतात. याशिवाय त्या दोघी झाडांसोबत रोमॅंटिक (Romantic) संवाद साधतात. या दोघी लेस्बियन असून त्या एलजीबीटी कम्युनिटीसाठी काम करतात. आमची प्रेमकहाणी जगाला झाडांचे संरक्षण करण्यासाठी प्रोत्साहित करणारी असल्याचे या दोघी सांगतात. जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल तर तुम्ही त्याला इजा करणार नाही, यामुळे झाडांना संरक्षण मिळेल, असा विश्वास त्या व्यक्त करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.