नवी दिल्ली 12 जुलै : विमानात अनेक विचित्र घटना घडल्याचं वृत्त गेल्या काही दिवसांपासून सतत समोर येत राहातं. अशातच आता अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. यात पॅरिसहून टोरंटोला जाणाऱ्या एअर फ्रान्सच्या फ्लाइटमध्ये एका व्यक्तीला त्याच्या सीटखाली रक्ताने माखलेलं कार्पेट सापडलं आणि ते त्याला स्वतः स्वच्छ करावं लागलं. हा अनुभव त्याच्यासाठी अतिशय भयानक होता. पत्रकार हबीब बट्टाह यांनी ट्विटरवर ही घटना सांगितली आहे. बट्टाहने सांगितलं की फ्लाइटमध्ये बसून त्याला एक तास झाला होता जेव्हा त्याला काहीतरी दुर्गंधी आल्यासारखं वाटलं. वास नेमका कुठून येत आहे, याचा त्याने शोध घेतला. तो सीटच्या खाली पाहण्यासाठी उठला तेव्हा त्याला कार्पेटवर एक मोठा डाग दिसला. त्याने स्पर्श करून बघितला असता ते ओलं होतं. जेव्हा त्यानी केबिन क्रूच्या लक्षात ही बाब आणून दिली तेव्हा एका अटेंडंटला धक्का बसला आणि तिने ते पुसण्याचा प्रयत्न केला. तो डाग पुसताच तो रक्तासारखा लाल झाला. प्लेनचं असं तिकीट, एकदा खरेदी केल्यावर लाइफटाइम जगभर विमान प्रवास FREE सीटखाली ठेवलेली प्रवाशाची बॅगही रक्ताने माखलेली होती. हे पाहून लोक घाबरले. बत्ताहने अर्धा तास हात आणि गुडघे स्वच्छ केले. त्याने पोस्टमध्ये लिहिलं, की एअर फ्रान्सच्या कर्मचाऱ्यांनी त्याला हातमोजे आणि वाइप्स दिले. त्यानंतर त्यांनी त्याला अनौपचारिकपणे सांगितलं की त्याच्या आधी विमानात बसलेल्या एका प्रवाशाला रक्तस्त्राव झाला होता. हे सगळं पाहून एअरलाईनचे अनेक कर्मचारी तिथे आले आणि सगळेच हैराण होते. फ्लाइट स्टाफने दावा केला की या घटनेनंतर सफाई कर्मचार्यांनी सीटवरील रक्ताचे डाग काढून टाकले होते, परंतु फरशी साफ केली नव्हती. हबीब बत्ताह यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “मी फक्त विचार करत राहिलो की ज्या प्रवाशाचं इतकं रक्त खाली पडलं आहे, त्याचं काय झालं असेल आणि त्याला नेमकं काय झालं होतं. एअर फ्रान्स स्टाफच्या एका सदस्याने इंटरनल ब्लीडिंग आणि इन्फेक्शनचा उल्लेख केला. एका वापरकर्त्याने लिहिलं की, “एका प्रवाशाला फ्लाईटमधील सीट साफ करण्यास कसं सांगितलं जातं.”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.