व्हिडिओमध्ये (Viral Video of Parrot) पाहायला मिळतं, की किचनमध्ये कामात व्यस्त असलेली एक महिला पोपटाच्या बोलण्याला उत्तर देत ‘आले बेटा’ म्हणत आहे. मग पोपट शिट्टी वाजवतो आणि ज्या मालकिणीला आपली आई मानतो तिच्याशी हिंदीत बोलायला लागतो. आई पुन्हा पोपटाला म्हणते "आले बेटा आले", "मी चहा घेऊन येते". हे ऐकताच पोपट आपल्या गोंडस शैलीत "चहा" असं म्हणतो. बापरे! श्वानाच्या तोंडात घुसला जगातील सर्वात विषारी साप; वाचवण्यासाठी मालकिणीने हात टाकला अन्... पोपटाचा हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, "जेव्हा कोणी एवढ्या आत्मीयतेने संवाद साधतो तेव्हा बोलण्यात एक वेगळीच मजा असते. हे सुंदर आणि निरागस संभाषण ऐकून असं वाटतं, की आपल्याला सगळ्या सजिवांसोबत बोलता यायला हवं होतं" क्लिपमध्ये, लाल रंगाचा पोपट लिव्हिंग रूममध्ये बसला आहे आणि आपल्या आईला (मालकिणीला) हाक मारत आहे. त्यानंतर तो तिच्याशी गप्पा मारू लागतो. मात्र व्हिडिओमध्ये तो नेमकं काय बोलत आहे हे व्यवस्थित समजत नाही. सुरुवातीला तो मम्मी अशी हाक मारतो. ज्यावर त्याची आई उत्तरात म्हणते की माझा सर्वात चांगला मुलगा. यानंतर पोपटाच्या गोड गोड गप्पा सुरू होतात. ट्विटरवर शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 46 हजारहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. नेटिझन्स या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत आणि बहुतेकांनी कमेंट्समध्ये या पोपटाला ‘स्वीट’ म्हटलं आहे.बात करने का अलग ही मज़ा होता है, जब कोई इतनी आत्मीयता से संवाद करता है.
यह खूबसूरत और मासूम वार्तालाप सुनकर लगता है काश हम सभी जीवों से ऐसे ही बात कर सकते... pic.twitter.com/uX80K59OPT — Dipanshu Kabra (@ipskabra) May 26, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.