मालकिणीसोबत इंग्लिशमध्ये गप्पा मारताना दिसला पोपट; VIDEO पाहून बसणार नाही डोळ्यांवर विश्वास
मालकिणीसोबत इंग्लिशमध्ये गप्पा मारताना दिसला पोपट; VIDEO पाहून बसणार नाही डोळ्यांवर विश्वास
मांजर आणि कुत्र्यांप्रमाणेच पक्षांनाही माणूस आपल्यावर करत असलेलं प्रेम चांगल्या पद्धतीने समजतं आणि माणसांची नक्कल करण्याबाबत तर ते अगदी पुढे असतात. सध्या अशाच एका पोपटाचा व्हिडिओ समोर आला आहे
नवी दिल्ली 12 एप्रिल : मानव आणि प्राणी यांचं नातं खूप खास आहे. माणूस प्राण्यांवर प्रेम करत असला तरी त्यांच्याप्रमाणे वागत नाही, परंतु प्राणी त्यांच्या मानवी मित्रांचं अनुकरण नक्कीच करू लागतात. मग तो कुत्रा असो, मांजर असो की इतर कोणताही पाळीव प्राणी. मांजर आणि कुत्र्यांप्रमाणेच पक्षांनाही माणूस आपल्यावर करत असलेलं प्रेम चांगल्या पद्धतीने समजतं आणि माणसांची नक्कल करण्याबाबत तर ते अगदी पुढे असतात. सध्या अशाच एका पोपटाचा व्हिडिओ समोर आला आहे (Parrot Speaking in English with Owner). तो आपल्या मालकिणीवरील प्रेम अशा पद्धतीने व्यक्त करतो, जणू तो तिचा जुना मित्र किंवा बाळ आहे.
ना लॉकडाऊन, ना युद्ध; तरीही 25 लाखाला विकलं जातंय एक बर्गर, संपूर्ण प्रकरण जाणून चक्रावून जाल
व्हायरल हॉग या प्रसिद्ध सोशल मीडिया अकाऊंटवर प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ अनेकदा पाहायला मिळतात. नुकताच असाच एक व्हिडिओ (Parrot Viral Video) चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये पोपटाची समज आणि त्याची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत स्पष्टपणे दिसत आहे. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की पोपट माणसाची कॉपी करून त्यांच्याप्रमाणेच काही शब्द बोलण्याचा प्रयत्न करतात. मात्र या व्हिडिओमध्ये दिसणारा पोपटा यापेक्षाही वेगळा आहे.
व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या पाळीव पोपटाशी बोलताना दिसत आहे. पोपट देखील तिचे शब्द पुन्हा बोलताना दिसतो आणि तिच्या ओठांवर चुंबन घेतो. ही महिला जेव्हा पोपटावरील प्रेम व्यक्त करते, तेव्हा तो जणू इंग्रजीत सांगू लागतो, की ती किती क्यूट आहे. यानंतर महिला पुन्हा त्याचे लाड करू लागते तेव्हा तो म्हणतो, 'थँक यू मामा' म्हणजेच थँक यू आई. दोघंही एकसारखे आवाज काढताना दिसत आहेत. पोपट अगदी या महिलेप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करताना दिसतो.
बायकोने अपमानाचा घेतला असा खतरनाक बदला; दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायलाही घाबरू लागला नवरा
लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. आतापर्यंत याला 18 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिलं की, मला या व्हिडिओवरच प्रेम झालं आहे. पोपट किती चांगला आहे. दुसऱअया एकाने लिहिलं की मला पोपटाची मालकीण आवडली. या पोपटाची आणि मालकिणीची जोडी सगळ्यांचंच मन जिंकत असून हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.