जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बायकोने अपमानाचा घेतला असा खतरनाक बदला; दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायलाही घाबरू लागला नवरा

बायकोने अपमानाचा घेतला असा खतरनाक बदला; दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायलाही घाबरू लागला नवरा

बायकोने अपमानाचा घेतला असा खतरनाक बदला; दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायलाही घाबरू लागला नवरा

ऑफिसच्या सहकाऱ्यांसमोर पत्नीने आपल्या पतीला घडवली चांगलीच अद्दल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 एप्रिल : नवरा-बायको म्हटलं की त्यांच्यात वादविवाद, भांडणं होतच असतात (Husband-Wife Relationship) . बरेच पुरुष आपल्या पत्नींची कदर करत नाहीत. त्यांना कमी लेखतात (Husband-Wife Issues) . अशाच एका पतीला त्याच्या पत्नीने चांगलीच अद्दल घडवली आहे. सर्वांसमोर आपला मान न राखणाऱ्या पतीला महिलेने असा धडा शिकवला की दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला जायलाही घाबरू लागला (Relationship Problems) . महिलेने आपल्या पतीसोबतचा आपला एक किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे. स्मार्टनेस दाखवण्याच्या नादात तिच्या नवऱ्याने असं काही केलं की महिला भडकली आणि तिने ऑन द स्पॉट पतीचा बदला घेतला. रेडीटवर तिने आपला हा किस्सा शेअर केला आहे. महिलेने सांगितलं त्याने आपल्या ऑफिसच्या काही सहाकाऱ्यांना घरी डिनरसाठी बोलावलं. जेव्हा ते घरी आले तेव्हा त्याने सर्वांसोबत आपल्या पत्नीची ओळख करून दिली. ही मिसेस स्मिथ आहे आणि ती गृहिणी आहे. असं त्याने आपल्या पत्नीबाबत सांगितलं. यावेळी त्याने तिचं नावही सांगितलं नाही. त्यामुळे पत्नीला राग आला. तिने हसत हसतच नवऱ्याला चांगलीच अद्दल घडवली. तिने नवऱ्याबाबत असं काही सर्वांना सांगितलं की त्याला लाज वाटली. दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायलाही तो घाबरत होता. हे वाचा -  कुत्र्यामुळे 7 वर्षांपासून रस्त्यावर राहतो व्यक्ती, नोकरी-घर गेलं तरी कुत्र्यावरचं प्रेम झालं नाही कमी तिने सांगितलं, “नाही, नाही मी पूर्ण वेळ काम करते आणि इथं मी गृहिणी असल्याचं नाटक करते. कारण तुम्ही माझी बिलकुल मदत करत नाहीत” यानंतर कर्मचाऱ्यांनीही परिस्थितीचं गांभीर्य समजून विषय बदलणंच योग्य असल्याचं समजलं. संपूर्ण पार्टीत तिच्या नवऱ्याचा चेहरा उतरला होता. तो पत्नीवर रागही काढतो होता. जसे घरातून सर्व पाहुणे गेले तसा त्याचा या राग उफाळून बाहेर आला. महिलेने पतीला सांगितलं, तेव्हा तिला जे करायचं होतं तेच तिने केलं. हे वाचा -  Merits of Dowry: हुंड्याचे फायदे सांगणारं पुस्तक, लोकांमध्ये प्रचंड खळबळ; जाणून घ्या, काय लिहिलंय पुस्तकात बहुतेकांनी या महिलेचं समर्थन केलं आहे. तिच्या बाजूनेच कमेंट येत आहे. जर महिलेच्या पतीने तिला सर्वांसमोर लाज वाटावी असं केलं असे तर त्याला त्याचं उत्तरही सर्वांसमोरच मिळायला हवं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात