Home /News /viral /

हाच खरा हिरो! VIDEO पाहून कुत्र्याच्या धाडसाचं होतंय कौतुक; नेमकं काय केलं पाहा

हाच खरा हिरो! VIDEO पाहून कुत्र्याच्या धाडसाचं होतंय कौतुक; नेमकं काय केलं पाहा

कुत्र्याने आपला जीव धोक्यात टाकून असं काही काम केलं की पाहूनच सर्वजण थक्क झाले.

    मुंबई, 19 जानेवारी : कुत्र्याचे बरेच व्हिडीओ (Dog video) सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. वेळप्रसंगी कुत्रा अनेकांच्या मदतीला धावून येतो. फक्त आपला मालक, माणसंच नाही तर अगदी इतर प्राण्यांचीही ते मदत करतात. अशाच एका कुत्र्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्याने आपला जीव धोक्यात टाकून एका हरणाचा जीव वाचवला आहे (Dog saved deer video). एका कुत्र्याने हरणाच्या पिल्लाला मृत्यूच्या दारातून खेचून काढलं आहे (Dog saved deer life video). हरणाचा बचाव करणाऱ्या कुत्र्याचा हा व्हिडीओ सर्वांचं मन जिंकतो आहे (Dog rescue deer from water video). व्हिडीओत पाहू शकता हरणाचं पिल्लू पाण्यात बुडतं आहे, गटांगळ्या खातं आहे. जीव वाचवण्यासाठी ते धडपडतं आहे. त्याला पाहताच काळ्या रंगाच्या याकुत्र्याने मागचा पुढचा कोणताही विचार न करता थेट पाण्यात उडी मारली. पोहोत पोहोत तो त्या हरणापर्यंत पोहोचला. हरणाची मान त्याने आपल्या तोंडात धरली. त्याने त्याला अशा पद्धतीने पकडलं आहे, ज्यामुळे त्याला त्याचे दात बिलकुल लागणार नाहीत. हरणाला तोंडात धरून कुत्रा पोहोत पोहोत पाण्यातून बाहेर येतो. बाहेर पडताच तो हरणाला आपल्या तोंडातून जमिनीवर सोडतो. हरण थोडं घाबरलेलं दिसतं. हे वाचा - OMG! चक्क बुर्ज खलिफावर उभी राहिली महिला, विमान आलं आणि...; धडकी भरवणारा VIDEO @FredSchultz35 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट कऱण्यात आला आहे. कुत्र्याच्या धाडसाचं नेटिझन्स कौतुक करत आहेत.  हा कुत्रा तर हिरो निघाला, या कुत्र्याने तर कमालच केली, अशा कमेंट या व्हिडीओवर आल्या आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Deer, Dog, Viral, Viral videos

    पुढील बातम्या