Home /News /viral /

बापरे! थेट 2 सिंहांसमोर छाती ताणत लढायला गेला तरुण आणि...; थरकाप उडवणारा VIDEO

बापरे! थेट 2 सिंहांसमोर छाती ताणत लढायला गेला तरुण आणि...; थरकाप उडवणारा VIDEO

Man fight with Lion video : एका व्यक्तीने थेट दोन सिंहांशीच पंगा घेतला आणि पुढे जे घडलं ते धक्कादायक होतं.

  मुंबई, 19 जानेवारी : सिंह (Lion video) म्हटलं तरी आपल्या अंगाचं पाणी पाणी होतं. सिंहाला पाहण्यासाठी म्हणून आपण जंगल सफारी, नॅशनल पार्कमध्ये जातो पण अगदी दुरून सिंह दिसला तरी धडकी भरते. त्याला जवळून पाहण्याचा विचार तर आपण स्वप्नातही करणार नाही. पण अशाच एक नव्हे तर चक्क दोन-दोन सिंहांसमोर जाऊन एक व्यक्ती छाती ताणून थेट लढण्यासाठीच उभी राहिली (Man fight with Lion video) . सिंहांशी लढणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Man stand in front of two lions). हा व्हिडीओ पाहून अक्षरशः घामच फुटेल. व्हिीडओत पाहू शकता एक व्यक्ती पाण्यात उभी आहे. पाण्याबाहेर किनाऱ्याजवळ एक सिंह उभा आहे. सिंह त्या व्यक्तीवर हल्ला करण्यासाठी तिथं आला.  आता सिंह समोर दिसला तर काय अवस्था होईल आपली. आपण आपला जीव मुठीत धरून तिथून पळून जाऊ नाही का? पण ही व्यक्ती मात्र आपल्या जागेवरून हटली तर नाहीच उलट ती सिंहाशी भांडत बसली. जणू काही समोर कुत्राच उभा आहे, असा तो सिंहाशी भांडतो आहे. हे वाचा - हाच खरा हिरो! VIDEO पाहून कुत्र्याच्या धाडसाचं होतंय कौतुक; नेमकं काय केलं पाहा तुम्ही व्हिडीओ नीट पाहिला तर व्यक्तीचा असा अवतार पाहून सिंहसुद्धा काही पावलं मागे जातो. त्यानंतर  आणखी एक सिंह तिथं येतो. तो सिंह व्यक्तीच्या दिशेने चालत येतो. तो या व्यक्तीवर हल्ला करणारच असतो. पण तरीसुद्धा ही व्यक्ती घाबरत नाही. अगदी छाती ताणून दोन-दोन सिंहासमोर ती उभी राहते आणि अगदी लढायलाही तयार होते. सिंहांना घाबरणं दूर उलट आपल्या हातांनी सिंहांना दटावत आपल्यापासून दूर हटायला सांगते. आश्चर्य म्हणजे पहिला सिंह त्या व्यक्तीपासून खूपच लांब जाऊन उभा राहतो तर दुसरा सिंहही मागे जाऊन गप्पपणे बसतो.
  या व्यक्तीसमोर आलेल्या सिंहांना पाहून तिथं उपस्थित नागरिक ओरडताना दिसत आहेत. सिंहाला पळवण्याचा आणि त्या व्यक्तीला सिंहापासून दूर कऱण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ही व्यक्ती मात्र कुणाचं एक ऐकत नाही. आपलं तेच खरं करते. हे वाचा - याला म्हणतात जिद्द; चित्त्यासोबत अखेरपर्यंत लढला कुत्रा, VIDEO चा शेवट बघाच nikulsinh_gohil नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट कऱण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Viral, Viral videos, Wild animal

  पुढील बातम्या