मराठी बातम्या /बातम्या /Viral /

क्या बात है! आखूड शेपटी लांब करण्यासाठी पोपटाची धडपड, VIDEO पाहून व्हाल थक्क

क्या बात है! आखूड शेपटी लांब करण्यासाठी पोपटाची धडपड, VIDEO पाहून व्हाल थक्क

पोपटाची (Parrot) कलाकारी पाहून तुम्हालाही कौतुक वाटेल.

पोपटाची (Parrot) कलाकारी पाहून तुम्हालाही कौतुक वाटेल.

पोपटाची (Parrot) कलाकारी पाहून तुम्हालाही कौतुक वाटेल.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 22 मार्च : पोपट हा अगदी माणसांप्रमाणे बोलूसुद्धा शकतो. पण कधी त्याला माणसांप्रमाणे डोकं चालवताना पाहिलं आहे का? अशाच एका पोपटाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये आपल्यातील एक उणीव भरून काढण्यासाठी पोपटाची धडपड सुरू आहे. त्याची शेपटी आखूड आहे आणि ती लांब करण्यासाठी नेमकं काय करतो ते व्हिडीओतच पाहा.

व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, की एक पोपट एक कॅलेंडर आपल्या चोचीने अगदी एखाद्या मशीनप्रमाणे कापून एकदमच वेगळं आणि सुंदर डिझाईन बनवतो आहे. असं वाटतं आहे, की जणू तो एखादं मस्त डिझाईन तयार करतो आहे. (viral video of parrot creating design). खरी गंमत तर पुढे आहे. पोपट असं का करतोय? तर कॅलेंडर अशा पद्धतीने कापून तो आपल्या शेपटीवर लावतो आहे. पोपटाची शेपटी आखूड आहे. कदाचित त्याला आपली शेपटी लांब हवी आहेत. त्यामुळे या कागदापासून तो आपली लांबलचक शेपटी बनवतो आहे.

View this post on Instagram

A post shared by wildlife 0.2 (@wildlife_0.2)

हा व्हिडिओ पाहिल्यावर एक गोष्ट तर नक्की सांगितली जाईल की क्रिएटिव्हिटीबाबत हा पोपट अनेकांना मात देईल. त्याच्या हुशारीला आणि फॅशन सेन्सलाही दाद द्यायला हवी.

हे वाचा - पहिल्यांदाच डेटवर गेलेल्या तरुणीची झाली भलतीच फजिती, मजेशीर VIDEO VIRAL

सोशल मीडियाच्या जगात विविध गोष्टी व्हायरल होत असतात. एखाद्या माणसाचा स्टंट, एखादा खास जुगाड, एखाद्या प्राणी-पक्ष्याची अनोखी कृती अशा गोष्टी लोकांना खूप आवडतात. आताही असाच एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. (viral video of parrot). हा व्हिडिओ खूपच क्रिएटिव्ह आणि धमाल आहे. यातील क्युटनेस अनेकांचं लक्ष वेधून घेतो आहे. व्हिडिओ बघितल्यावर तुम्हालाही समजेल, की निसर्गानं क्रिएटिव्हिटी केवळ माणसांनाच नाही तर पशू-पक्ष्यांनाही दिली आहे. (parrot making design of calendar) हा गमतीदार व्हिडी इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. अगदी काही तासांतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला. लोकांना हा व्हिडिओ खूपच आवडतो आहे. व्हिडिओ पाहून लोक पोपटाचं भरभरून कौतुक करत आहेत. (yellow parrot art viral video)

हे वाचा - खाद्यतेलाचा टँकर पलटी होताच तेल घेण्यासाठी लोकांची उडाली झुंबड, Video Viral

इंटरनेटच्या जगात प्राण्यांच्या कलाकारीबाबतचे अनेक व्हिडिओज सतत व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज इतके मजेशीर आणि क्युट असतात, की लोक यांना पुन्हापुन्हा पाहून मजा घेतात.

First published:

Tags: Instagram, Parrot, Pet animal, Social media viral, Viral video.