Home /News /viral /

खाद्यतेलाचा टँकर पलटी होताच तेल घेण्यासाठी लोकांची उडाली झुंबड, Video Viral

खाद्यतेलाचा टँकर पलटी होताच तेल घेण्यासाठी लोकांची उडाली झुंबड, Video Viral

खाद्यतेलाची वाहतूक (Edible Oil Tanker) करणारा एक टँकर महामार्गावर पलटी झाला. या घटनेची माहिती पोलिसांच्या आधी आसपासच्या लोकांपर्यंत पोहोचली आणि मग काय फुकटचं तेल मिळवण्यासाठी घटनास्थळी एकच गर्दी झाली.

    नवी दिल्ली 21 मार्च : इंदौर-बैतूल महामार्गावर बारीनाकाजवळ खाद्यतेलाची वाहतूक (Edible Oil Tanker) करणारा एक टँकर पलटी झाला. महामार्गावर एका कार चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात टँकर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि मोहरीच्या तेलानं भरलेलं हे वाहन पलटी झालं. या घटनेची माहिती पोलिसांच्या आधी आसपासच्या लोकांपर्यंत पोहोचली आणि मग काय कोणी डबा तर कोणी इतर भांडी घेऊन फुकटचं तेल मिळवण्यासाठी घटनास्थळी पोहोचलं. अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळेच जास्तीत जास्त तेल मिळवण्याच्या प्रयत्नात दिसले. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला आहे. ही घटना हाटपिपल्या ठाण्याच्या क्षेत्रातील आहे. टँकरमधून तेल काढून घेऊन जाण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केल्यानं वाहतूकदेखील विस्कळीत झाली. विशेष बाब म्हणजे पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतरही हे लोक न घाबरता तेल काढून घेऊन जात होते. इतकंच नाही तर रस्त्यानं जाणारे इतर लोकही हे फुकटचं तेल घेऊन जाण्यात सामील होते. जे भांडं मिळेल त्यात तेल भरुन लोक घेऊन जात होते. या लोकांची तेल चोरण्यासाठीही ही धडपड पाहाण्यासारखी आहे. इंदौर - बैतूल महामार्गावर याच घटनेमुळे भरपूर वेळ वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. यामुळे या मार्गानं प्रवास करणाऱ्यांना या समस्येचा सामना करावा लागला. पोलिसांनी अनेक प्रयत्न करुनही टँकरमधून तेल लुटण्याच्या प्रयत्नात असलेले लोक मागे हटले नाहीत. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, की कशाप्रकारे पोलिसांच्या उपस्थितीमध्येही हे लोक टँकरमधून तेल काढण्याच्या कामात मग्न आहेत. अखेर या लोकांची गर्दी हटवण्यात अनेक प्रयत्नांनंतर पोलिसांना यश आलं. यानंतर वाहतूककोडीं कमी होऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Funny video

    पुढील बातम्या