रायपूर, 19 जुलै : दिवसरात्र प्रत्येकाच्या सोबत जो कुणी असेल तर तो मोबाईल. काहींना तर मोबाईलचं इतकं वेड की ते मोबाईलशिवाय राहूच शकत नाही. मोबाईलसाठी ते काहीही करतात. अगदी स्वतःच्या जीवाचीही पर्वा करत नाही. असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. एक मुलगी मोबाईलच्या प्रेमात वेडी झाली. तिच्या या प्रेमाला पालकांनी विरोध करताच तिने टोकाचं पाऊल उचललं. मिनी नायगारा फॉल्समध्ये तिने उडी मारली. छत्तीसगडमधील ही धक्कादायक घटना. बस्तरमधील जगदलपूरपासून 38 किलोमीटर अंतरावर असलेला चित्रकोट धबधबा पावसाळ्यात खूपच सुंदर दिसतो. या धबधब्याचे सौंदर्य आणि खडकांमधून पडणाऱ्या इंद्रावती नदीचं पाणी यामुळे या धबधब्याचे आकर्षण आणखी वाढतं. हे केवळ पर्यटकांना आकर्षित करत नाही, तर निसर्गप्रेमींचं आवडतं ठिकाण बनल्यामुळे हा भारतातील मिनी नायगारा फॉल्स म्हणूनही ओळखला जातो. या अशा सुंदर चित्रकोट धबधब्यावरील धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. डेंजरस इश्क! गर्लफ्रेंडच्या Love Bite ने घेतला बॉयफ्रेंडचा जीव; नेमकं काय घडलं? VIDEO VIRAL या सुंदर धबधब्यावरून एका मुलीने उडी मारली आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता धबधब्याच्या उंचावर एक मुलगी दिसते आहे. थोड्यावेळाने ती तिथून धबधब्यात उडी मारते. जिथून तिने उडी मारली ती जागा 90 फूट उंच आहे. तिला उडी मारताना पाहून तिथं असलेल्या पर्यटकांचा आरडाओरडा सुरू झाला. त्यांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला. पण तिनं कुणाचंच ऐकलं नाही. घटनास्थळी उपस्थित काही लोकांनी हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओत पुढे पाहाल तर मुलगी पाण्यात पोहोताना दिसते आहे. इतक्या खतरनाक धबधब्यातूनही ती वाचलेली दिसते आहे. सुदैवाने ती बचावली पोलिसांनी तिला कुटुंबाच्या ताब्यात दिलं आहे. मुलगी व्हिडीओ बनवत होती, आईने जोरात लगावली कानशिलात; पुढे काय घडलं पाहा माहितीनुसार मुलगी जवळच्याच परिसरात राहते. मोबाईल फोन वापरल्यामुळे तिचे पालक तिला ओरडले. याच रागात तिनं असं पाऊल उचललं.
A woman attempted to commit suicide by jumping into #Chitrakoot waterfall of Bastar district, #Chhattisgarh Fortunately, the woman managed to swim back to shore.* ,,, मोबाइल फोन के इस्तेमाल पर परिजनों ने एतराज जताया था, इसपर ये नाराज थी #mobile pic.twitter.com/lxBBvuDjI8
— Abhitosh Singh अभितोष सिंह 🇮🇳 (@abhitoshsingh) July 19, 2023
@abhitoshsingh ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.