नवी दिल्ली, 19 जुलै : लोक सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काय काय करतील याचा नेम नाही. आजकाल तरुणांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वच सोशल मीडियावर चर्चेत राहण्यासाठी काहीतरी हटके गोष्टी करताना दिसून येतात. विशेषत: तरुणाई याकडे जास्त आकर्षित झाली असून खाता-पिता, बसता ते कायम मोबाईल हातात घेऊन पोस्ट शेअर करत असतात. असाच एका तरुणीचा व्हिडीओ समोर आलाय जी इंटरनेटवर शेअर करण्यासाठी व्हिडीओ बनवते मात्र तिची आई तिला अद्दल घडवते. मुलगी मोबईल घेऊन व्हिडीओ बनवत असते. ती नेटकऱ्यांना जेवायला बोलवते. मात्र तिची आई अचानक तिच्या कानशिलात लगावते ज्यामुळे तीदेखील थक्क होते. मात्र तरीही ती व्हिडीओ बनवते. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक मुलगी सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सला अपडेट देत आहे की ती जेवण करणार आहे. एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातात जेवणाचं ताट घेऊन ही मुलगी सोशल मीडियावर ‘हॅलो गाईज जेवायला या’ म्हणत आहे. तिच्या या कृतीवर आई संतापते आणि तिच्या जोरात कानशिलात लगावते. तिची आई म्हणते पटकन जेवन करुन घे चार तास झालाय मोबाईल घेऊन बसलीय. यानंतर ती मुलगी दुःखाने सगळ्यांना बाय म्हणते. हा व्हिडीओ अनेकांना पोट धरुन हसवत आहेत. तुम्हीही व्हिडीओ पाहिला तर तुम्हालाही हसू आवरणार नाही. @seriousfunnyguy नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 17 सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसत आहेत.
Life of a Social Media Influencer🥹
— 𝐒𝐮𝐝𝐡𝐢𝐫 भारतीय 🇮🇳 (@seriousfunnyguy) July 17, 2023
https://t.co/CL5SAtSG6p
दरम्यान, या व्हिडीओवरुन तुम्हाला अंदाज लावता येईल की आजची पिठी किती मोबाईलच्या आहारी गेली आहे. त्यांना प्रत्येक गोष्टीची अपडेट सोशल मीडियावर शेअर करायची असते. मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेकांवर वाईट परिणाम होताना दिसून येतो.