जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Video Viral : मुंबईतील मुलाला दहावीत 35%; आई वडिलांनी जे केलं ते पाहून व्हाल थक्क

Video Viral : मुंबईतील मुलाला दहावीत 35%; आई वडिलांनी जे केलं ते पाहून व्हाल थक्क

मुलगा पास झाल्याचा आनंद पालकांनी साजरा केला

मुलगा पास झाल्याचा आनंद पालकांनी साजरा केला

मुलाला 10वीत केवळ 35% गुण मिळाले. तेव्हा आई-वडिलांना फटकारण्याऐवजी तो 10वी पास झाल्याचा आनंद साजरा केला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 09 जून : आपल्या मुलाने टॉप करावं, अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. अनेकांनी मुलांना अशी अटही घातलेली असते, की एवढे मार्क्स मिळाले तर हे मिळेल, इतके मार्क मिळाले ते मिळेल आणि अपेक्षेप्रमाणे मार्क्स नाही मिळाले तर ते मुलावर ओरडायला लागतात. 80% मार्क्स मिळाल्यावरही अनेक जण आपल्या मुलांवर रागवतात. मात्र आता एका मुलाच्या पालकांनी जे केलं ते हृदयस्पर्शी आहे. मुलाला 10वीत केवळ 35% गुण मिळाले. तेव्हा आई-वडिलांना फटकारण्याऐवजी तो 10वी पास झाल्याचा आनंद साजरा केला. मिठाई देत त्याचा लाड केला. सध्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो तुमचंही मन जिंकेल. आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी लिहिलं, मुंबईतील दहावीच्या विद्यार्थ्याने परीक्षेत 35% गुण मिळवले. पण दुःखी किंवा रागावण्याऐवजी त्याच्या पालकांनी त्याचं यश साजरं केलं. अधिक तपास केला असता विशाल अशोक कराड असं मुलाचं नाव असल्याचं समोर आलं. तो अगदी काठावर पास झाला. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेत तो टॉप झाल्यासारखा आनंद त्याच्या कुटुंबाने साजरा केला. त्याला सर्व विषयात 35-35 गुण आले आहेत. एक नंबर आजी! ब्रेकअप झालेल्या नातीला दिला लय भारी सल्ला; VIRAL VIDEO एकदा पाहाच मीडिया रिपोर्ट्सनुसार, विशाल ठाणे, मुंबई येथे राहतो आणि त्याने मराठी माध्यमातून दहावीचं शिक्षण घेतलं आहे. त्याचे वडील ऑटो रिक्षा चालवतात. आई दिव्यांग असून घरोघरी मोलकरीण म्हणून काम करते. मुलाला शिक्षण मिळावं यासाठी वडिलांनी खूप धडपड केली. त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून विशालने पास व्हावं, अशी त्यांची इच्छा होती. ते म्हणाले- विशालचे 35% गुणही आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्यानी आमचा अभिमान वाढवला आहे. विशालला इंजिनीअरिंगमध्ये करिअर करायचं आहे.

जाहिरात

हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट होताच व्हायरल झाला. काही तासांतच तो जवळपास 2 लाख वेळा पाहिला गेला. 5000 हून अधिक लाईक्स आणि हजारो कमेंट्स मिळाल्या. वापरकर्ते पालकांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून आनंदी आहेत आणि अशा लोकांना त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचा सल्ला देत आहेत, जे प्रत्येक वेळी त्यांच्या मुलाला फटकारतात. अनेकांनी आई-वडिलांसाठी लव्ह इमोजी शेअर केले आणि विशालला शुभेच्छा दिल्या. आणखी एका युजरने लिहिलं, मुलांना तणावापासून दूर ठेवण्यासाठी पालकांचा सहनशील मार्ग.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात