पमुक्कले, 5 एप्रिल : जगात अशी अनेक रहस्य आहेत जी आजही एक कोडं बनून राहिलीत. यातली अनेक रहस्य तर अशी आहेत जी अगदी शास्त्रज्ञांनाही सोडवता येत नाहीत. यातलंच एक रहस्य आज जाणून घ्या. (Pamukkale Hot Springs)
हे रहस्य आहे एका ठिकाणाचं. या ठिकाणाबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हीही थक्क व्हाल. ही जागा आहे तुर्कीमधील पमुक्कलेच्या पहाडांमध्ये असलेला नैसर्गिक पूल. हा पूल आपल्या सौंदर्यासह गूढपणामुळेही ओळखला जातो. हा पूल लोकांसाठी कुतूहलाचा विषय बनलेला आहे. (turkey hot water streams)
इथं असलेल्या झऱ्याचं पाणी आपोआप गरम होतं. याचं रहस्य आजवर कुणीच उलगडू शकलेलं नाही. असं सांगितलं जातं, की इथं असलेले गरम पाण्याचे झरे (Pamukkale Thermal Pools) अनेक हजार वर्ष जुने आहेत. या झऱ्यांच्या पाण्याचं तापमान 37 ते 100 डिग्रीच्या मध्ये आहे. असं सांगितलं जातं, की या नैसर्गिक स्विमिंग पूलमध्ये अंघोळ केल्यानं अनेक आजार विशेषतः त्वचेबाबतचे आजार नीट होतात. (mysterious streams of turkey)
हेही वाचा महिलेनं तळहातावर घेतला सुंदर ऑक्टोपस, मात्र त्याचा धोका वाचून हादराल
यामुळेच हे झरे आजही पर्यटकांची पहिली पसंत बनलेले आहेत. गरम पाण्याचे हे झरे पहायला आजही जगभरातून लाखो लोक येतात. या झऱ्यांबाबत सर्वात मोठं गूढ हेच आहे, की इथले गरम पाण्याचे झरे नैसर्गिकपणे बनलेत की बनवले गेलेत. याबाबत आजवर कुणालाच काही माहीत नाही. (turkey tourist spot of hot water streams)
हेही वाचा या कलावंतानं लॉकडाऊनच्या काळात बनवलं महाकाय चित्र, मिळाली तब्बल 450 कोटी किंमत
या झऱ्यांच्या पाण्याबाबत शास्त्रज्ञांनी अनेकदा संशोधन केलं आहे. त्यांच्या मते, इथल्या पाण्यात असलेली खनिजं बाहेरच्या वातावरणाच्या संपर्कात आल्याने कॅल्शियम कार्बोनेट बनतं. ते या झऱ्यांच्या कडांवर आजही जमलेलं आहे. कदाचित यामुळेच या झऱ्यांनी सरोवराचं रूप घेतलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.