मराठी बातम्या /बातम्या /Viral /या कलावंतानं लॉकडाऊनच्या काळात बनवलं महाकाय चित्र, मिळाली तब्बल 450 कोटी किंमत

या कलावंतानं लॉकडाऊनच्या काळात बनवलं महाकाय चित्र, मिळाली तब्बल 450 कोटी किंमत

कलाकार संकटातही संधी शोधून त्याचं सोनं कसं करतो हे या चित्रकाराकडे पाहून समजतं.

कलाकार संकटातही संधी शोधून त्याचं सोनं कसं करतो हे या चित्रकाराकडे पाहून समजतं.

कलाकार संकटातही संधी शोधून त्याचं सोनं कसं करतो हे या चित्रकाराकडे पाहून समजतं.

दुबई, 28 मार्च : चित्रकलेची दुनियाच अनोखी असते. अनेकदा विविध चित्रं इतकी महाग विकली जातात की त्यांची किंमत ऐकून आपल्याला काय बोलावं तेच कळत नाही. असंच एक प्रकरण समोर आलं आहे दुबईमधून. (Dubai news)

दुबईमध्ये एका चित्राचा लिलाव चक्क 45 मिनियन पाउंड्समध्ये झाला आहे. या चित्राचं आगळंवेगळं वैशिष्ट्य म्हणजे हे हे जगातल्या सर्वात मोठ्या कॅनव्हासवर तयार केलेलं आर्टवर्क आहे. (worlds biggest painting in dubai)

रॉयटर्सच्या एका वृत्तानुसार, हे चित्र ब्रिटिश कलाकार सचा जाफरी यांनी बनवलं आहे. आजवर एखाद्या हयात असलेल्या माणसाच्या चित्रावर लागलेली ही सर्वाधिक मोठी अशी दुसऱ्या क्रमांकाची बोली आहे. हे चित्र तब्बल 17,176 स्क्वेअर फुट मोठं आहे. ही जागा इतकी मोठी आहे, की सहा टेनिस कोर्ट्स या जागेत बसू शकतात. (dubai painter Sacha jafri paints biggest artwork in lock down)

हे चित्र दुबईच्या अटलांटिस हॉटेलच्या बॉलरूम फ्लोरवर एका मोठ्या कॅनव्हासवर काढलं गेलं. हे कोरोना लॉकडाऊनच्या काळात सात महिन्याच्या काळात रंगवलं गेलं. वृत्तानुसार, लिलावासाठी या सगळ्या चित्राला 70 लॉट्समध्ये विभागलं गेलं. मात्र या सगळ्या लॉट्सना अँड्रे अब्डोने यानं विकत घेतलं. अँड्रे हे फ्रांसचे आहेत आणि त्यांचा क्रिप्टोकरन्सीचा व्यवसाय आहे. (dubai big lock down painting)

हेही वाचा विमानातच प्रवाशानं केलं असं कृत्य की सगळेच चक्रावले,क्रू मेंबर्सचीही उडाली धांदल

अँड्रे या चित्राला पुन्हा लिलावात काढून समाजसेवेसाठी निधी जमावणार आहेत. सध्या त्यांनी चित्र दुबईतच ठेवलं आहे. जाफरी यांचं म्हणणं आहे, की या चित्राचा लिलाव करून त्यांना लहान मुलांच्या आयुष्यात परिवर्तन घडवायचं आहे. त्यांना या कॅनव्हासला 1800 चौरसमीटर भागात विभागून त्याची वेगवेगळी बोली लावून लिलाव करायचा होता. मात्र  अँड्रे यांनी चित्र एकाच बोलीत संपूर्णपणे विकत घेतलं.

जाफरी सांगतात, की दुबईमध्ये वास्तव्याला असताना लॉकडाऊन लागला तेव्हा त्यांच्या मनात हे चित्र बनवण्याचा विचार आला. 'कनेक्शन अँड आयसोलेशन'

या थीमवर आधारित हे चित्र त्यांनी बनवलं. यासाठी तब्बल 1065 पेंट ब्रश आणि 6300 लिटर रंग वापरले आहेत.

हेही वाचा Holi 2021: लखनऊमध्ये 'बाहुबली गुजिया'ची चर्चा; वाचा किती आहे वजन आणि किंमत

याआधी एका चित्रावर 2018 साली 90.3 मिलियन रुपयांची बोली लागली होती. ही आजवरची हयात व्यक्तीच्या चित्रावर लागलेली सर्वात महाग बोली आहे. डेव्हिड हॉकनी यांच्या 1972 सालच्या चित्रावरची ही बोली होती.

First published:
top videos

    Tags: Dubai, Lockdown, Painting