इस्लामाबाद, 23 मार्च : पाकिस्तान खरोखर एक अजब देश आहे. इथं कधी काय होईल सांगता येत नाही. सध्या एका मजेदार कारणानं पाकिस्तान चर्चेत आहे. पाकिस्तानच्या एका युनिव्हर्सिटीतली एक नोटीस त्याला कारण ठरली आहे. (Pakistan news) झालं असं, की पाकिस्तानमधील एका युनिव्हर्सिटीनं विद्यार्थ्यांवर कारवाई केली. या कारवाईचं कारण हे, की ते दोघे म्युझिक ऐकत होते. एवढंच नाही, तर या नोटीसमध्ये जे इंग्रजी लिहिलं गेलं आहे ते भयंकर विनोदी आहे. (gomal university viral notice) या नोटीसवरून सोशल मीडियावर या युनिव्हर्सिटीची खूप खिल्ली उडवली जाते आहे. एका ट्विटर युजरनं विचारलं आहे, की अशा प्रशासनावर कारवाई कोण करेल? ज्या दोन विद्यार्थ्यांवर दंड लावला गेला ते गोमाल युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटिंग अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विभागात शिकतात. ICIT डिपार्टमेंटचे चेअरमन असलेल्या झियाउद्दिन यांच्या मते ‘हे दोघे विद्यार्थी ज्यावेळी ब्ल्यूटुथ स्पीकरनं म्युझिक ऐकत होते तेव्हा वर्ग सुरू होता. यातून शिकवण्यात व्यत्यय आला. (funny english notice of pak university)
Gomal University Dear* Ismail Khan 😂😂😂
— Amir Zaman (@AmirZamanWazir) March 20, 2021
Who will fine such administrators ? What kind of certificate is this to fine students for “lestening” music? 😜
“Lestening of music” is illegal; “listening to music” is fine. Courtesy: @farooqpirsai pic.twitter.com/4m9gj9jxPv
चेअरमन हेसुद्धा म्हणाले, की या दोन्ही विद्यार्थ्यांना अनेकदा म्युझिक बंद करायला सांगितलं गेलं. मात्र त्यांनी ऐकलं नाही. तेव्हा त्यांचं ब्लूटूथ स्पीकर जप्त करण्यात आलं. हेही वाचा डुक्कराच्या पेंटिगमुळे मालकीण झाली श्रीमंत; हा अनोखी प्रकार वाचून थक्क व्हाल! विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर डॉ. इफ्तिखार अहमद म्हणाले, की जर कुणी इतरांना त्रास न देता संगीत ऐकत असेल तर आमची काही हरकत नाही. मात्र विद्यापीठात स्मोकिंग, ड्रग्ज आणि राजकीय गोष्टींमध्ये सहभागी होण्यास मनाई आहे. (pak university fines students for music)
Via Akif Khan pic.twitter.com/iHpR1Y0A5Q
— Ali Aftab Saeed (@aliaftabsaeed) March 20, 2021
मागच्याच आठवड्यात युनिव्हर्सिटी ऑफ लाहोरनं एक विद्यार्थी आणि विद्यार्थिनीला निलंबित करण्याचा निर्णय घेतला. त्यावर सोशल मीडियावरच्या युजर्सनी बरीच टीका केली. हेही वाचा खाद्यतेलाचा टँकर पलटी होताच तेल घेण्यासाठी लोकांची उडाली झुंबड, Video Viral या युनिव्हर्सिटीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात एक विद्यार्थिनी एका विद्यार्थ्याला प्रपोज करत होती.