Home /News /viral /

शेरास सव्वाशेर! तोऱ्यात चॅलेंज देणाऱ्या तरुणालाच खोडकर माकडाने...; VIDEO पाहून शॉक व्हाल

शेरास सव्वाशेर! तोऱ्यात चॅलेंज देणाऱ्या तरुणालाच खोडकर माकडाने...; VIDEO पाहून शॉक व्हाल

माकडाशी पंगा घेणाऱ्या तरुणाला माकडाने शिकवला असा धडा.

  मुंबई, 15 मार्च :  माकड किती खोडकर असतं हे तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. गावात किंवा बऱ्याच पर्यटनस्थळी माकडं असतात. जे माणसांना कितीतरी त्रास देतात. अशा माकडांशी माणसांनी मुद्दामहून पंगा घेतला मग त्यांचं काही खरं नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एका तरुणाने एका माकडाला तोऱ्यात चॅलेंज दिलं. त्यानंतर माकडाने असं काही केलं की पाहून तुम्हीही शॉक व्हाल (Monkey video viral). लहानपणी टोपीवाला आणि माकडाची गोष्ट तर तुम्हाला माहितीच असेल. या गोष्टीत माकडाने केलेली टोपीवाल्याची नक्कल तुम्ही कधीच विसरणार नाही. खरंतर या गोष्टीप्रमाणेच प्रत्यक्षात माकडं माणसांची नक्कल करण्यात तरबेज असतात याचा अनुभव तुम्ही स्वतः घेतला असाल किंवा एखाद्या व्हिडीओत पाहिलं असेल. खरंच माकड असं करू शकतं का किंवा माकडाला सतावण्याच्या उद्देशाने म्हणा एका तरुणाने माकडाला आपली नक्कल करण्याचं चॅलेंज दिलं. हे वाचा - VIDEO - समोर खतरनाक प्राणी आला, पळायचं सोडून व्यक्ती गिटार वाजवत राहिली आणि...
  एका मोठ्या मैदानात एका ठिकाणी काही व्यक्ती उभ्या आहेत. त्यापैकी फक्त एक तरुण या व्हिडीओत दिसत आहे. त्यांच्यापासून दूर काही अंतरावर एक माकडही बसलेलं दिसतं आहे. मजेमजेत या तरुणाने माकडाशी पंगा घेतला. दूर बसलेल्या माकडाला त्याने आवाज दिला आणि त्याला एक चॅलेंज दिलं. व्हिडीओत पाहू शकता  माकड त्याच्याकडे पाहत होतं, त्यावेळी त्याने त्याला ब्लॅकफ्लिप मारून दाखवलं. या तरुणाने एकदा ब्लॅक फ्लिप मारला. त्याला पाहताच माकडानेही तसंच केलं. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल माकडाने एक नव्हे तर लागोपाठ दोन ब्लॅक फ्लिप मारल्या. तू शेर तर मी सव्वाशेर हेच या माकडाने त्या तरुणाला दाखवून दिलं. त्याला चॅलेंज देणाऱ्या तरुणालाच त्याने उलट चॅलेंज दिसलं. हे वाचा - VIDEO: पाण्यातून बाहेर आल्याने मरणाच्या दारात पोहोचला मासा; कासवाने वाचवला जीव @FredSchultz35 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.  हे ठिक आहे पण तू दोनवेळा करू शकतो का? असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. माकडाला असं काही करताना पाहून ते तरुणही थक्क झाले आणि हसू लागले.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Viral, Viral videos, Wild animal

  पुढील बातम्या