मुंबई, 11 ऑक्टोबर : दृष्टिभ्रमाचा म्हणजेच ऑप्टिकल इल्युजनचा वापर अनेक बुद्धिमत्ता चाचण्यांमध्ये केला जातो. काही दृष्टिभ्रम तुमचं व्यक्तिमत्त्वं तपासतात, तर काही तुमचा दृष्टिकोन तपासतात. डोळे पाहतात ते खरं नसून, वास्तव काही वेगळं आहे, हे मेंदू कशा पद्धतीनं स्वीकारतो, समजून घेतो यावरच हा सगळा खेळ असतो. सोशल मीडियावर या दृष्टिभ्रम चाचण्या खूप लोकप्रिय आहेत. यांचा वापर करून आपली बुद्धिमत्ता तपासण्याची अनेकांना इच्छा होते. असंच एक दृष्टिभ्रम निर्माण करणारं चित्र सोशल मीडियावर व्हायरल झालंय. त्यात समुद्रातील ऑक्टोपस शोधायचा आहे. बुद्धिमान व्यक्ती 17 सेकंदांच्या आत हे उत्तर शोधू शकतील, असा दावा त्यात करण्यात आला आहे. दृष्टिभ्रम निर्माण करणारी चित्रं मजेशीर असतात. त्यातून समोरच्याच्या बुद्धिमत्तेचा कस लागतो. स्वतःची बुद्धिमत्ता तपासण्यासाठी अनेक जण दृष्टिभ्रमाच्या चाचण्या घेतात; मात्र काहीच जण त्यात यशस्वी होतात. दिलेल्या वेळेआधी दृष्टिभ्रमाची चाचणी सोडवणारे बुद्धिमान असतात, असा दावा केला जातो. या बातमीसोबत दिलेल्या फोटोमधलं दृष्टिभ्रमाचं कोडं सोडवण्यासाठी 17 सेकंदं देण्यात आली आहेत. हे वाचा - Optical Illusion : घराच्या अंगणात लपलाय चोर, हुशार असाल तर ओळखा चोराचा खरा चेहरा! हा फोटो एका समुद्रकिनाऱ्याचा आहे. त्यातला ऑक्टोपस तुम्हाला शोधायचा आहे. समुद्राच्या तळाच्या भागाचा हा फोटो आहे. त्यात शेवाळ जमा झालेले काही खडक दिसत आहेत. त्यात ऑक्टोपस अशा पद्धतीनं लपून बसला आहे, की तो शोधणं हे मोठं आव्हान आहे. डोळे आणि मेंदूला ताण देऊनच हे काम करावं लागेल.
या फोटोतला ऑक्टोपस 17 सेकंदांच्या आत शोधू शकणाऱ्याचे डोळे आणि बुद्धी चाणाक्ष असेल, असा दावा करण्यात आला आहे. त्या दृष्टीने पुन्हा पुन्हा हा फोटो पाहून ऑक्टोपस शोधण्याचा प्रयत्न करा. तरीही सापडला नाही, तर काळजी करू नका. फोटोच्या मधल्या भागात लक्ष केंद्रित करा. गोल गोल खडकांच्या मध्ये त्यांच्यासारखाच असलेला ऑक्टोपस दिसेल. हे वाचा - तुमची नजर, बुद्धिमत्तेची घ्या चाचणी! चित्रातल्या ‘या’ वृद्धाच्या पत्नीला शोधा 11 सेकंदांत सोशल मीडियावर हा फोटो खूप व्हायरल होतो आहे. अशा पद्धतीच्या दृष्टिभ्रमाच्या फोटोजना युझर्सची नेहमीच पसंती मिळते. डोळ्यांना दिसणाऱ्या वास्तवापेक्षा काही वेगळं मेंदू ओळखू शकला, तर त्यातून बुद्धिमत्तेचा विकास घडतो. बुद्धी अधिक तल्लख बनवण्यासाठी याचा भरपूर वापर केला जातो. तसंच मानसशास्त्रातही याचा वापर केला जातो.
एखाद्या चित्राकडे किंवा फोटोकडे पाहून माणूस त्याचं आकलन कशा पद्धतीनं करतो, ते जाणून घेऊन त्यावर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व तपासलं जातं. या दृष्टिभ्रमाच्या चाचणीचं कोडं 17 सेकंदात शोधणं जमलं तर तुमची बुद्धिमत्ता चांगली आहे असं समजायला हरकत नाही.