वॉशिंग्टन, 21 ऑक्टोबर : नुकतीच तुमच्या घरात दिवाळी ची साफसफाई झाली असेल. त्यावेळी घराच्या एखाद्या कोपऱ्यातून झुरळही बाहेर पडलं असेल. घरात झुरळं असणं तसं चांगलं नाही. पण तुमच्या घरात झुरळं आहेत म्हणून कुणी तुम्हाला अटक झाली तर… असंच एका महिलेसोबत घडलं आहे. या महिलेच्या घरात झुरळं सापडली म्हणून तिला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अमेरिकेतील हे हैराण करणारं प्रकरण आहे. 51 वर्षांची कॅरीन कीज एक सामाजिक कार्यकर्ता आहे. तिच्या घरात झुरळं सापडली. त्यानंतर तिला पोलिसांनी अटक केली. झालं असं की, या महिलेच्या घरी काही रुग्ण आले होते. ती त्या रुग्णांना भेटत होती. तेव्हा त्यापैकी एका रुग्णाने चुकून तिच्या घरातील फायर अलार्म वाजवला. त्यामुळे अग्निश्मन दलाची गाडी तात्काळ तिच्या घराबाहेर आली. अग्निशमन दलाच्या जवानांना तिच्या घरात जे दिसलं ते पाहून धक्काच बसला. हे वाचा - Cockroach in Ear : कानात घुसलं झुरळ, महिलेने घाईघाईत माऊथवॉश ओतलं; अशी अवस्था झाली की रुग्णालयात पोहोचली तिच्या घरात चक्क झुरळं होती. आता यात धक्का बसण्यासारखं काय असं तुम्ही म्हणाल. तर तिच्या घरात एक-दोन किंवा दहा नव्हे तर तब्बल एक लाख झुरळं होती. काय आता तुम्हालाही जबरदस्त झटका बसला ना? थोडं थांबा पिक्चर अभी बाकी है… फक्त झुरळच नव्हे तर 300 पेक्षा जास्त इतर पशू-पक्षी ही तिच्या घरात होते. यात 118 ससे, 150 पक्षी, 7 कासवं, 3 साप आणि 15 मांजरींचा समावेश होता.
बेकायदेशीररित्या घरात प्राणी ठेवल्याच्या आरोपात तिच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तिच्या घरातील हवा इतकी हानिकारक होती कुणीच जास्त वेळ तिथं राहू शकत नव्हता. बचाव दलाला हेजमॅट सूट घालावा लागला. तक्रारदार जेड पेंटरने सांगितलं की, तिथं भयाण वातावरण होतं. माणूस काय कोणताच प्राणीही तिथं राहू शकत नाही. सगळीकडे जमिनीवर मलमूत्र होतं. हे वाचा - अजबच! आता कुत्रा नाही तर झुरळ पकडणार चोराला; वैज्ञानिकांनी विकसीत केलं नवं तंत्र माहितीनुसार या महिलेचं प्राण्यांवर खूप प्रेम होतं. त्यामुळे तिच्या जवळचे लोक तिला स्नो व्हाइट म्हणायचे. तिच्या एका मित्राने सांगितलं की, एक पाळीव प्राण्यांचं दुकान बंद होत असल्याचं तिला समजलं आणि त्यांना वाचवण्यासाठी ती गेली. ते बेघर होऊ नयेत, असं तिला वाटत होतं. ती प्राण्यांचा छळ करायची नाही. आपले सर्व पैसे त्यांना एक चांगलं घर देण्याच्या प्रयत्नात तिने खर्च केला. जेव्हा कोणता प्राणी आजारी आहे आणि त्याला घराची गरज आहे, असं तिला वाटायचं तेव्हा त्याची चांगली देखभाल करायची.