मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अजबच! आता कुत्रा नाही तर झुरळ पकडणार चोराला; वैज्ञानिकांनी विकसीत केलं नवं तंत्र

अजबच! आता कुत्रा नाही तर झुरळ पकडणार चोराला; वैज्ञानिकांनी विकसीत केलं नवं तंत्र

सायबोर्ग झुरळाचा उपयोग गुन्हेगारांना शोधण्यासाठी आणि कुणी संकटात पडलं असेल तर अशा समूहाचा शोध घेण्यासाठी होऊ शकतो, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.

सायबोर्ग झुरळाचा उपयोग गुन्हेगारांना शोधण्यासाठी आणि कुणी संकटात पडलं असेल तर अशा समूहाचा शोध घेण्यासाठी होऊ शकतो, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.

सायबोर्ग झुरळाचा उपयोग गुन्हेगारांना शोधण्यासाठी आणि कुणी संकटात पडलं असेल तर अशा समूहाचा शोध घेण्यासाठी होऊ शकतो, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

 मुंबई,07 सप्टेंबर :  तंत्रज्ञान हे एक वरदानच आहे असं नेहमी म्हटलं जातं. तंत्रज्ञानाने मानवी जीवनाच्या प्रत्येक गोष्टीत डोकावायला सुरुवात केलीय. चोर-पोलिस ह्या खेळात तंत्रज्ञानाच्या साह्याने आता शास्त्रज्ञांनी हस्तक्षेप केलाय. शास्त्रज्ञांनी तंत्रज्ञानाच्या साह्याने खास शक्ती असलेलं कृत्रिम झुरळ विकसित केलंय आहे. हे झुरळ गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरू शकेल. या कृत्रिम झुरळाचं लहान व्हर्जन शास्त्रज्ञांनी तयार केलंय आणि त्याची चाचणी सुरू आहे. या सायबोर्ग झुरळाचा उपयोग गुन्हेगारांना शोधण्यासाठी आणि कुणी संकटात पडलं असेल तर अशा समूहाचा शोध घेण्यासाठी होऊ शकतो, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. या नव्या आणि अद्भुत तंत्राद्वारे विविध गोष्टी करणं सोपं होणार आहे. याबाबतचं वृत्त 'आज तक'ने दिलं आहे. सायबोर्ग ही सायन्स फिक्शनमधली संकल्पना असून, सायबोर्ग म्हणजे असा जीव, ज्याची शक्ती विज्ञानाच्या साह्याने वाढवलेली असते.

या नव्या विकसित तंत्राद्वारे हवामान आणि हवामानातले बदल यांची माहिती मिळवणं, नैसर्गिक आपत्ती म्हणजे भूकंप, पूर, वादळ, अतिवृष्टी अशा काळात संपर्क राखणं, एखाद्या ठिकाणी अडकलेल्या जमावाला वाचवणं किंवा तिथपर्यंत मदत पोहोचवणं यासारख्या गोष्टी करणं सुकर होणार आहे. npj Flexible Electronics जर्नलमध्ये या संशोधनाबद्दलची माहिती दिली आहे. त्या माहितीनुसार, शास्त्रज्ञांनी कुठल्याही विद्युत उपकरणाच्या मदतीशिवाय हा सायबोर्ग रिचार्ज करून दाखवला आहे. या तंत्राद्वारे जीव आणि तंत्रज्ञानाची उत्तमरीत्या सांगड घातल्याचं दिसून आलं.

हेही वाचा - Maruti Suzuki Celerio: 'या' कारनं तोडले सर्व रेकॉर्ड! मागणीमध्ये एका वर्षात तब्बल 1094 टक्क्यांची वाढ

बॅटरीचा कमीत कमी वापर होईल अशा सेमीकंडक्टर चिपद्वारे सायबोर्गची निर्मिती करण्यात आलीय. हे तंत्रज्ञान जपानच्या 'सेंटर फॉर इमर्जंट मॅटर सायन्स'च्या शास्त्रज्ञांनी विकसित केलंय. या टीमने या सायबोर्ग झुरळाचा एक नमुना तयार केला आणि ते थेट जिवंत झुरळाच्या नर्व्हस सिस्टीमशी जोडलं गेलं. निरीक्षणात असं दिसून आलं की त्याचं पॉवर आउटपुटआधीच्या नमुन्यापेक्षा 50 पटींनी अधिक वाढलं आहे.

सायबोर्ग झुरळ अल्ट्राथीन सोलर सेलच्या मदतीने बनवलं गेलं आहे. यामुळे सायबोर्गच्या हालचालींवर याचा परिणाम होत नाही. याशिवाय संशोधकांच्या या टीमने या सायबोर्गची हालचाल वायरलेस सिग्नलच्या माध्यमातून कशी योग्य पद्धतीने होते याचंही प्रात्यक्षिक दाखवलं. वायरलेस सिग्नल या सायबोर्ग झुरळाच्या नर्व्हस सिस्टिमशी जोडलेले असतात. तसंच बॅटरीच्या माध्यमातून सिग्नलचं ट्रान्समिशन केलं जातं असं शास्त्रज्ञांनी सांगितलं. त्याचप्रमाणे या नव्या डिव्हाइसवर अजूनही संशोधन सुरू असून आणखी लोकोपयोगी सुविधांसाठी त्याचा वापर करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

First published:

Tags: Dog, Scientist