नवी दिल्ली, 30 एप्रिल : जशी अॅक्शन तशी रिअॅक्शन… कर्माची फळं आपल्याला भोगावी लागतातच. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एका तरुणाच्या कर्माचं फळ त्याला तिथल्या तिथं मिळालं आहे. चालत्या बाईकवरून या तरुणाने म्हशीला लाथ मारली पण पुढच्याच क्षणी त्याच्यासोबत भयंकर घडलं. म्हशीला लाथ मारणाऱ्या तरुणाचीच वाट लागली आहे. आपण कुणाचं वाईट केलं नाही तर आपलंही वाईटच होतं, असं आपल्याला मोठे लोक सांगतात. याचाच प्रत्यय या व्हिडीओत आला आहे. मुक्या जीवांना त्रास देऊ नये, असं सांगितलं जातं. पण काही लोक आपल्या मजामस्तीसाठी मुक्या जीवांच्या जीवाशी खेळतात. या व्हिडीओतील तरुणही तेच करत होता. पण पुढच्याच क्षणी त्याला त्याच्या वाईट कर्माचं फळ मिळालंच.
व्हिडीओत पाहू शकता दोन तरुण बाईकवरून जात आहे. रस्त्यात म्हशी उभ्या आहेत. एक म्हैस पाठमोरी उभी आहे. VIDEO - बापरे! कारला लाथ मारताच हे काय घडलं? कॅमेऱ्यात कैद झालं भयंकर दृश्य बाईक त्या म्हशींजवळ जाताच बाईकच्या मागील सीटवर बसलेला तरुण आपला उजवा पाय उचलतो आणि पाठमोरी उभ्या असलेल्या म्हशीच्या मागे लाथ मारतो. पण यानंतर त्या तरुणासोबतच भयंकर घडतं. म्हशीला लाथ मारल्यानंतर आपल्यासोबत काय घडणार आहे, याची कल्पना स्वप्नातही या तरुणाने केली नसेल. जशी तो म्हशीला लाथ मारतो. तसा बाईक चालवणाऱ्या तरुणाचं बाईकवरील नियंत्रण सुटतं आणि बाईक हलू लागते. मागे बसलेला तरुण लाथ मारताच हवेत उडतो आणि बाईकवरून खाली कोसळतो. रस्त्याशेजारी असलेल्या झुडुपांमध्ये तो पडतो. त्यानंतर तो दिसतही नाही. @cctvidiots या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. इन्स्टंट कर्मा असं या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं आहे. बाईकचा स्टंट असा फसला, स्वत: तर पडलाच दुसऱ्यालाही लावलं ‘धंद्या’ला, पाहा Video व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. म्हशीला लाथ मारली आणि देवाने त्याला उलटी लाथ मारली, हा तर न्यूटनचा थर्ड लॉ ऑफ मोशन झाला, एव्हरी अॅक्शन हॅझ इक्वल अँड अपोझिट रिअॅक्शन, अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर उमटत आहेत.
Instant karma 😂 pic.twitter.com/jNFMfEf9Fm
— CCTV IDIOTS (@cctvidiots) April 30, 2023
तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.