जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बाईकचा स्टंट असा फसला, स्वत: तर पडलाच दुसऱ्यालाही लावलं 'धंद्या'ला, पाहा Video

बाईकचा स्टंट असा फसला, स्वत: तर पडलाच दुसऱ्यालाही लावलं 'धंद्या'ला, पाहा Video

बाईक स्टंट व्हिडीओ

बाईक स्टंट व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर दररोज एकापेक्षा एक व्हिडीओ समोर येत आहेत. यापैकी काही व्हिडीओ हे स्टंटचे असतात, तर काही मजेदार किस्यांचे. हे व्हिडीओ पाहण्यात लोकांचा वेळ कसा निघून जातो, हे त्यांचं त्यांनाच कळत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. हा एका स्टंटचा व्हिडीओ आहे. पण तरुणाचा हा स्टंट फसतो. त्यानंतर जे काही घडतं ते पाहून तुम्ही नक्कीच पोट धरुन हसाल. तसे पाहाता स्टंट व्हिडीओ हे धोकादायक असतात, ज्यामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत, तर काही लोक गंभीर जखमी देखील झाले आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : सोशल मीडियावर दररोज एकापेक्षा एक व्हिडीओ समोर येत आहेत. यापैकी काही व्हिडीओ हे स्टंटचे असतात, तर काही मजेदार किस्यांचे. हे व्हिडीओ पाहण्यात लोकांचा वेळ कसा निघून जातो, हे त्यांचं त्यांनाच कळत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. हा एका स्टंटचा व्हिडीओ आहे. पण तरुणाचा हा स्टंट फसतो. त्यानंतर जे काही घडतं ते पाहून तुम्ही नक्कीच पोट धरुन हसाल. तसे पाहाता स्टंट व्हिडीओ हे धोकादायक असतात, ज्यामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत, तर काही लोक गंभीर जखमी देखील झाले आहेत. पण या व्हायरल व्हिडीओला पाहून तुम्ही तुमचं हसू रोखूच शकणार नाही. मासे पकडण्यासाठी चिमुकल्याचा अजब जुगाड, Video पाहून नेटकरी कौतुक करताना थकत नाहीत हा व्हिडीओत दोन तरुण आहेत. त्यांपैकी एक तरुण आपल्या बाईस सोबत स्टंट करतो, तर दुसरा तरुण त्याला बघत उभा असतो. पण स्टंट करणाऱ्या तरुणाचा तोल बिघडतो आणि गाडी सकट तो पुढे जातो. हा तरुण आपली गाडी सांभाळण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचा हा प्रयत्न उलटा पडतो.

News18लोकमत
News18लोकमत

बाईक या तरुणाच्या हातातून आणखी निसटते, ज्यामुळे हा तरुण पुढच्यावेळी दुसऱ्या तरुणावर पडतो, ज्यामुळे काहीही चुकी नसताना तो दुसरा तरुण देखील या स्टंटचा बळी ठरतो. अखेर दोघेही आपली गाडी घेऊन खाली पडतात. या दोघांना नक्कीच दुखापत झाली असावी, पण हा व्हिडीओ पाहून तुम्ही स्वत:चं हसू थांबवू शकणार नाहीत.

जाहिरात

हा व्हिडीओ race_madura नावाच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्याला लाखोवेळा लोकांनी पाहिलं आहे. या व्हिडीओवर लोकांनी भरभरुन कमेंट्स देखील केल्या आहेत. पण या उदाहरणाला एक उदाहरण म्हणून घ्या आणि असा स्टंट करण्याची हिंमत करु नका.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात