जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बाईक खरेदी करण्यासाठी चिल्लर घेऊन पोहोचला तरुण, पुढे जे घडलं ते आश्चर्यकारक

बाईक खरेदी करण्यासाठी चिल्लर घेऊन पोहोचला तरुण, पुढे जे घडलं ते आश्चर्यकारक

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

तुम्हीही 10 रुपयांच्या नाण्यांची इतकी मोठी राशी पाहून आश्चर्यचकीत झाल्याशिवाय राहणार नाही.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 27 ऑक्टोबर : आपण लहानपणापासून एक म्हण ऐकली असेल की, ‘थेंबे थेंबे तळे साचे’ आणि ते खरे देखील आहे. म्हणूनच तर मुलांना लहान पणापासून पिगी बँकची सवय लावली जाते. ज्यामध्ये मुलं त्यांना मिळालेले पैसे त्यामध्ये जमा करुन ठेवातात. हे पैसे काही काळाने मग खूपच जास्त असल्याची आपल्याला जाणीव होते. खरंतर या गोष्टीला एका तरुणाने इतकं मनावर घेतलं की त्याने आपण साचवलेली नाणी घेऊन बाईक घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्याच्यासोबत जे घडलं त्याची आपण कल्पना देखील करु शकत नाही. हे प्रकरण उत्तराखंडमधील रुद्रपूरचे आहे. ज्युपिटर खरेदीचे स्वप्न उराशी बाळगून एक तरुण जेव्हा बाईक शोरूममध्ये पोहोचला तेव्हा लोक चक्रावून गेले. त्यांनी 10 रुपयांच्या नाण्यांमध्ये 50 हजार रुपये दिले. हे ही पाहा : Reel करणाऱ्या मुलांनी बस ड्रायव्हरला बनवलं मूर्ख, Video सोशल मीडियावर व्हायरल त्याचे हे पैसे मोजताना शोरूम कर्मचाऱ्याची अवस्था बिकट झाली. मात्र मोठ्या संयमाने कर्मचारी तरुणाच्या ठेवी मोजताना दिसून आले. यादरम्यान कोणीतरी या अद्भुत प्रसंगाचा व्हिडीओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. तुम्हीही 10 रुपयांच्या नाण्यांची इतकी मोठी राशी पाहून आश्चर्यचकीत झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडीओत नक्की काय घडलं व्हायरल व्हिडीओमध्ये, एक माणूस खुर्चीवर शांतपणे बसलेला दिसत आहे, तर एक चष्मा घातलेली व्यक्ती समोरच्या टेबलावर नाणी मोजताना दिसत आहे. येथे एक व्यक्ती 50 हजार रुपये घेऊन आला, पण तो 10-10 रुपयांच्या नाण्यांच्या स्वरुपात. परंतु कर्मचार्‍यांनी तरुणाच्या या इच्छेचा आदर केला आणि त्याने कष्टाने कमावलेल्या या पैशातून त्याला ज्युपीटर विकत घेण्यात मदत केली आणि शांतपणे ती नाणी मोजायला बसले.

आधीच घडल्यात अशा घटना नाणी देऊन हजारो लाखांची खरेदी करण्याची योजना एखाद्या व्यक्तीने राबविण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा असे घडले आहे. एकेकाळी आसाममध्ये एक माणूस आपल्या बचतीतून गोणी भरून नाणी घेऊन स्कूटर घ्यायला आला होता. जिथे तीन-तीन जण त्याची गोणी उचलताना दिसले.

News18लोकमत
News18लोकमत

एकदा, चीनच्या टोंगरेन नावाच्या शहरातील एक माणूस त्याच्या स्वप्नांची बीएमडब्ल्यू कार घेण्यासाठी ट्रकमध्ये भरलेली 900 किलो नाणी घेऊन शोरूममध्ये पोहोचला तेव्हा तो आणखीनच टोकाला गेला. ती नाणी मोजण्यासाठी शोरूममध्ये बँक कर्मचाऱ्यांना बोलवावे लागले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात