मुंबई, 14 जून : बऱ्याचदा लोक अशा काही विचित्र गोष्टी करतात की ज्यामुळे त्यांच्या नावे रेकॉर्ड देखील होतात. आता तर या स्पर्धेत प्राणी देखील उतरले आहेत. एका कुत्र्याने आपल्या नावे नवीन विक्रम झाला आहे. या कुत्र्याने एका मिनिटात असे केले आहे, ज्याचा कोणी विचारही केला नसेल. त्याच्या या पराक्रमामुळे त्याने जुना विश्वविक्रम मोडत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. हे प्रकरण ब्रिटनमधील अबरडीन येथील आहे. कुत्र्याने एका मिनिटात पिगी बँकेत 23 नाणी टाकली. लिओ असे या 2 वर्षाच्या कुत्र्याचे नाव आहे. त्याची मालकीण एमिली अँडरसन त्याच्या या पराक्रमाने खूप खूश आहे. इतर कुत्र्यांच्या तुलनेत एका मिनिटात पिगी बँकेत सर्वाधिक नाणी टाकण्याचा विक्रम लिओच्या नावावर आहे. General Knowledge : असा कोणता प्राणी आहे जो पाण्यात राहून देखील कधीही पाणी पित नाही? त्याला हे यश असेच मिळालेले नाही. उलट त्याला त्याच्या जन्मापासून म्हणजेच गेल्या २ वर्षांपासून प्रशिक्षण दिले जात होते. त्याने ट्रीटसाठी नाणी उचलली आणि पिगी बँकेत ठेवली. या प्रकरणाविषयी बोलताना लिओची शिक्षिका आणि ओनर एमिलीने स्थानिक मीडिया एबरडीन लाइव्हला सांगितले की, नाणे त्याच्या समोर ठेवा. त्यानंतर तो उचलून स्वत: पिगी बँकेत टाकतो. लिओचा एक फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये तो वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेटसोबत दिसत आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘लिओकडे शेअर करण्यासाठी एक अतिशय खास बातमी आहे. आता तो अधिकृतपणे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डधारक बनला आहे. त्याने एका मिनिटात त्याच्या पिगी बँकेत 23 नाणी टाकली. ज्यामुळे हे शक्य झाले त्या सर्वांचे आभार. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे आणि पुरावे आवश्यक होते. Interesting Facts : पक्षी उंच तारेवर झोपले असताना देखील खाली का पडत नाही? या पोस्टला हजारो लोकांनी लाईक केले असून लोक त्यावर भरभरून कमेंट करत आहेत. लिओचे अभिनंदन करत आहेत. तर काही नेटकऱ्यांना हे ऐकायला विचित्र वाटत आहे. पण काहीही असलं तरी प्राणी प्रेमींना मात्र याबातमीने खूपच आनंद झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.