नवी दिल्ली, 29 ऑगस्ट : आपल्या डोक्यात किडा वळवळतो किंवा लहान मुलांच्या अंगात किडे असतात असं म्हणायची पद्धत आपल्याकडे बघायला मिळते मात्र खरंच एका तरुणाच्या डोक्यात किडा आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आतापर्यंत कोळी किंवा घोण कानात गेल्याचं ऐकलं असेल पण डोक्यातून किडा काढल्याच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चीनच्या जिआंग्सु प्रांतात एक भयंकर प्रकार समोर आला आहे. 23 वर्षाीय तरुणाच्या डोक्यात 17 वर्षापासून किडा वळवळत होता. या तरुणाच्या म्हणण्यानुसार 6 वर्षांचा असल्यापासून हात आणि पाय बधीर व्हायचे. अनेक उपाय करूनही काही पर्याय सुचत नव्हता. काही वर्षांनंतर शरीरातील काही भागांचं सेंन्सेशन गेल्यानंतर तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेतला.
डॉक्टरांनी पहिल्यांदा या तरुणाला पहिल्यानंतर कच्च किंवा अर्धवट शिजवलेलं मांस खाल्ल्यामुळे हा आजार झाल्याचं सांगितलं. त्यावेळी आई-वडिलांनी या तरुणाला लहानपणापासून होणारा त्रास सांगितला. सुरुवातीला ही अनुवंशिक समस्या असल्याचं समजून घरच्यांनीही दुर्लक्ष केलं. हे वाचा- सिलिंडरसोबत सापाचीही होम डिलिव्हरी, VIDEO पाहून व्हाल हैराण तरुणाच्या डोक्यातू काढला 5 इंच लांब किडा सिटीस्कॅन केल्यानंतर रिपोर्ट पाहून डॉक्टरही हैराण झाले. या तरुणाच्या डोक्यात 5 इंचाचा किडा असल्याचं दिसून आलं. त्यानंतर ऑपरेशन करून हा किडा काढण्यात आला. दूषित पाणी आणि अर्धकच्च मांस खाल्ल्यामुळे असे प्रकार होऊ शकतात असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. या किड्याने तरुणाऱ्या डोक्यावर परिणाम केला होता. त्यामुळे तरुणाच्या अनेक अवयवांमधील सेंन्सेशन नाहीसं झालं होतं. जवळपास 17 वर्षांपासून हा किडा डोक्यात असूनही तरुण जिवंत राहिल्याची ही पहिलीच घटना समोर आल्याचं सांगितलं जात आहे.