सिलिंडरसोबत सापाचीही होम डिलिव्हरी, VIDEO पाहून व्हाल हैराण

सिलिंडरसोबत सापाचीही होम डिलिव्हरी, VIDEO पाहून व्हाल हैराण

सिलिंडरच्या खालच्या भागात अशा पद्धतीनं साप फसून राहिल्याचं पाहून वन्य अधिकारीही हैराण झाले आहेत.

  • Share this:

फतेहाबाद, 28 ऑगस्ट : मुसळधार पावसामुळे अनेक सरपटणारे जनावरं घराच्या अडोशाला किंवा मानवी वस्तीत येताना दिसत आहेत. पुरामुळे अनेक सरपटणारे प्राणी घरात आल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. एका बँक कर्मचाऱ्याच्या घरात सिलिंडरसोबत सापाची होम डिलिव्हरी झाल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

हरियाणातील फतेहाबाद जिल्ह्यातील प्रभाकर कॉलनीमध्ये हा भयंकर प्रकार घडला आहे. सिलिंडरच्या खालच्या भागात 3 फूट लांब साप वेटोळ करून बसला होता. सिलिंडरसोबत त्याचीही होम डिलिव्हरी झाल्यानं खळबळ उडाली. या घटनेची माहिती वन्य अधिकाऱ्यांना तातडीनं देण्यात आली.

हे वाचा-बापरे! लग्न लागत असतानाच वर-वधूवर कोसळली वीज, थरकाप उडवणारा VIDEO VIRAL

सिलिंडरच्या खालच्या भागात अशा पद्धतीनं साप फसून राहिल्याचं पाहून वन्य अधिकारीही हैराण झाले आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सिलिंडर घेताना अथवा देताना गृहिणी आणि घरातील व्यक्तींनी अत्यंत सतर्क राहाणं गरजेचं आहे. सध्या मुसळधार पाऊस असल्यामुळे अनेक सरपटणार जनावरं आतमध्ये राहण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अशा बाबतीत सतर्क राहायला हवं.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 28, 2020, 3:32 PM IST

ताज्या बातम्या