मराठी बातम्या /बातम्या /Viral /इथंही सोडली नाही एकमेकांची साथ, वृद्ध दाम्पत्याने एकत्र ऐटीत सोडला धूर; पाहा VIDEO

इथंही सोडली नाही एकमेकांची साथ, वृद्ध दाम्पत्याने एकत्र ऐटीत सोडला धूर; पाहा VIDEO

आजोबांसोबतच आजीही चिलम फुंकताना दिसली.

आजोबांसोबतच आजीही चिलम फुंकताना दिसली.

आजोबांसोबतच आजीही चिलम फुंकताना दिसली.

मुंबई, 05 ऑक्टोबर : लग्न (Wedding) म्हणजे सात जन्मानचं (Marriage) बंधन. लग्नावेळी सप्तपदी (Married couple) घेताना सात वचनं एकमेकांना दिली जातात. ही सात वचनं आयुष्यभर निभवावी लागतात. एकमेकांच्या सुखदुःखात साथ द्यावी लागते (Older couple). अशीच एकमेकांना साथ देताना दिसले ते आजी-आजोबा. आजीने तर अगदी चिलम फुंकतानाही आजोबांची साथ सोडली नाही (Older couple smoking togeher).

बहुतेक पुरुषांना दारू, सिगारेट पिण्याची सवय असते. काही महिलांना मात्र आपल्या नवऱ्याच्या या सवयी आवडत नसतात. पण या आजीबाईंनी मात्र यातही आपल्या नवऱ्याची साथ सोडली नाही. त्यांच्या नवऱ्याला चिलम ओढण्याची सवय होती. त्याला त्यांनी विरोध केला नाही. उलट त्या स्वत:च आपल्या नवऱ्यासोबत चिलम ओढतात.

व्हिडीओत पाहू शकता, एक वृद्ध दाम्पत्य एका कठड्यावर एकमेकांशेजारी बसलेलं आहे. वृद्ध महिलेच्या हातात चिलम आहे. ती बिनधास्त चिलम ओढते आहे आणि अगदी ऐटीत धूर सोडते. त्यानंतर तिच्या शेजारी बसलेला वृद्ध व्यक्ती म्हणजे तिचा नवरा तिच्या हातातील चिलम घेतो आणि ओढतो. दोघंही असं एकच चिलम आळीपाळीने ओढताना दिसतात.

हे वाचा - Oh no! उत्साहात मिठी मारणं पडलं महागात; कपलसोबत काय घडलं पाहा Video

आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. बिनधास्त! दीर्घ आणि आनंदी वैवाहिक आयुष्याचं सिक्रेट असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. सोबतच शेअरिंक इज केअरिंग असंही म्हटलं आहे.

आजही काही ठिकाणी जेवतानाही महिला आपल्या नवऱ्यांसोबत बसत नाहीत. पण या आजी मात्र चक्क आपल्या नवऱ्यासोबच चिलमच ओढायला बसल्या आहेत. त्यांच्या एकमेकांवर किती प्रेम, विश्वास आणि आदर आहे हेच यातून स्पष्ट होतं.

हे वाचा - 'लग्नानंतर तू...', बोहल्यावर चढण्याआधी मित्राने दिला जोर का झटका; नवरदेव हादरला

आतापर्यंत कितीतरी ऊन-पावसाळे पाहिले. संकटांचा सामना केला. यानंतर या वयात हे वृद्ध दाम्पत्य 'हम फिक्रे को धुएं मे उडाते चले गए' असंच सांगताना दिसतं आहे.  या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत.

First published:
top videos

    Tags: Viral, Viral videos