मराठी बातम्या /बातम्या /Viral /

'लग्नानंतर तू...', बोहल्यावर चढण्याआधी मित्राने दिला 'जोर का झटका'; नवरदेव पुरता हादरला

'लग्नानंतर तू...', बोहल्यावर चढण्याआधी मित्राने दिला 'जोर का झटका'; नवरदेव पुरता हादरला

मित्राचं ते बोलणं ऐकून नवरदेवाच्या तोंडावर वाजले बारा.

मित्राचं ते बोलणं ऐकून नवरदेवाच्या तोंडावर वाजले बारा.

मित्राचं ते बोलणं ऐकून नवरदेवाच्या तोंडावर वाजले बारा.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 05 ऑक्टोबर :  किती तरी जणांना आपल्या लग्नाची खूप उत्सुकता असते. काही जण तर इतके उतावळे असतात, की गुडघ्याला बाशिंग बांधूनच तयार असतात. लग्नासाठी उत्सुक असलेल्या अशाच एका नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. पण लग्न होण्याआधीच या नवरदेवाला त्याच्या मित्राने जोर का झटका दिला आहे.

नवरदेवाच्या मित्राने नवरदेवाला असं काही सांगितलं की नवरदेवाला धक्काच बसला. तो पुरता हादरला. आपल्या नवरीला घ्यायला निघालेल्या नवरदेवाची मान खालीच झुकली.

व्हिडीओत पाहू शकता, नवरदेव आपल्या कुटुंबासोबच चालतो आहे. वरात घेऊन ते नवरीला आणायला निघाला आहेत. नवरदेवाच्या शेजारीच त्याचे मित्र आहेत. जे त्याच्यासोबत चालत आहेत.

हे वाचा - VIDEO - क्युट दिराला पाहताच स्वतःला आवरू शकली नाही नवरी; नवरदेवाच्या नकळत...

नवरदेवाचा एक मित्र त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि नवरदेवाला अलर्ट करताना दिसतो. गात गात नवरदेवाचा मित्र त्याला इशारा देतो. गायक प्रभ गिलचं प्रसिद्ध गाणं तू रोएगा, पछताएगा, यावर तो आपल्या मित्राला इशारा देतो.  नवरदेव सुरुवातीला मित्रांसोबत कॅमेऱ्याकडे पाहतो. त्याच्या चेहऱ्यावर किंचितसं हसूही दिसतं. पण जेव्हा मित्राला गाण्यातून काय सांगायचं आहे हे समजतं तेव्हा नवरदेवाला धक्काच बसतो. बिच्चारा नवरदेव टेन्शनमध्ये येतो आणि गप्पपणे आपली मान खाली घालून चालू लागतो.

हे वाचा - तरुणीला होता बॉयफ्रेंडवर संशय; अनोख्या पद्धतीचा वापर करत शोधलं सत्य

लवदीप कल्याण इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

First published:

Tags: Viral, Viral videos, Wedding video