चेन्नई, 30 सप्टेंबर : ट्रेन, बसमधील भांडणं तुमच्यासाठी नवी नाहीत. बसमध्ये धक्का लागला म्हणून किंवा सीटसाठी वगैरे भांडणं होतातच. अशाच बसमधील भांडणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. यामध्ये एका वृद्ध महिला प्रवाशाने बस कंडक्टरशी हुज्जत घातली आहे. आजीबाईंनी सरकारी बसमध्ये जबरदस्त गोंधळ घातला. पण खरंतर हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही कौतुक वाटेल. आजीबाईचं कंडक्टरसोबत वाद घालण्याचं जे कारण आहे, ते खूप वेगळं आहे. तामिळनाडूच्या कोइंबतूरमधील ही घटना आहे. व्हिडीओ तुम्ही पाहू शकता कंडक्टरसोबत आजी कशापद्धतीने भांडते आहे. कंडक्टर तिला शांतपणे समजावण्याचा प्रयत्न करतो पण आजीबाई त्याचं एक ऐकत नाही. आजीच्या हातात काहीतरी आहे आणि ती ते त्या कंडक्टरच्या हातात देण्याचा प्रयत्न करते. कंडक्टर ते घ्यायला नकार देतो. हे वाचा - …जेव्हा Pm Narendra Modi यांच्या गाडीसमोर आली Ambulance; काय घडलं पाहा VIDEO व्हिडीओतील भाषा तामिळ आहे. पण माहितीनुसार आजी कंडक्टरसोबत तिकिटीच्या पैशांवरून भांडत होती. आता तिकिटच्या पैशांवरून वाद म्हणजे कंडक्टरने जादा पैसे वगैरे घेतले असावेत किंवा आजी पैसे द्यायला नकार देत असावी, असं तुम्हाला वाटेल. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल कंडक्टर पैसे नको म्हणत असताना आजी त्याला जबरदस्ती आपल्या तिकिटाचे पैसे देत होती.
#DMKFailsTN
— வால் ரைட்டிங் தென்ஸ் (@WALWRITINGTHENS) September 29, 2022
'ஓசி'யில் நான் வரமாட்டேன்...
காசு வாங்கிட்டு டிக்கெட் கொடு என நடத்துனரிடம் வாக்குவாதம் செய்யும் மூதாட்டி...
I won't be in 'OC'... Old woman arguing with the conductor asking for money and giving tickets...#TamilNadu #Bus #Conductor@annamalai_k pic.twitter.com/YqETITu3By
मधुकराईहून पलाथुराईला ही बस जात होती. बसमधील कंडक्टर तिकीट तिकीट ओरडत होता. कुणाचं तिकीट बाकी असेल त्याला तिकीट घ्यायला सांगत होता. तेव्हा या आजी स्वतः त्या कंडक्टरजवळ जातात आणि तिकीट घेऊन कंडक्टरला पैसे देऊ करतात. हे वाचा - अंकल-भैया म्हटल्यानं कॅब ड्रायव्हर नाराज, अखेर लावला असा जुगाड; Photo सोशल मीडियावर व्हायरल कंडक्टरने आजीकडून पैसे घ्यायला नकार देत होता. सरकारी बसमध्ये तुम्हाला पैसे देऊन प्रवास करण्याची गरज नाही, तुम्हाला सरकारी बसमधून प्रवास मोफत आहे, असं त्याने तिला सांगितलं. पण मला फ्री प्रवास करायचा नाही असं आजीनेही स्पष्टपणे सांगितलं. पैसे घेण्यासाठी ती त्याच्यासोबत भांडू लागली. अखेर कंडक्टरला पैसे दिले तेव्हाच ती शांत बसली. कंडक्टरनेही आजीच्या जिद्दीसमोर हार मानली. त्याने तिच्याकडून काही पैसे घेतले आणि तिला तिकीट दिलं.